डुप्लीकेट आधारद्वारे सिमकार्ड अॅक्टिव्ह करायचे, पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड

| Updated on: Jun 22, 2023 | 6:47 PM

यूपी पोलिसांनी तेथील एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला. छापेमारीत पोलिसांनी काही सिमकार्ड जप्त केले. मात्र या सिमकार्ड बाबत अधिक तपास घेतला असता धक्कादायक माहिती पुढे आली.

डुप्लीकेट आधारद्वारे सिमकार्ड अॅक्टिव्ह करायचे, पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड
बोगस आधार कार्डद्वारे सिमकार्ड अॅक्टिव्हेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकीकडे सरकारने ओळखीच्या पुराव्यांबाबत कठोर धोरण अवलंबले असतानाच बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डचा गोरखधंदा मात्र छुप्या पद्धतीने सुरुच आहे. मुंबई पोलिसांनीही अशा बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या टोळ्यांवर विशेष पाळत ठेवली आहे. अशाच एका मोहिमेदरम्यान बोरीवली पोलिसांनी बनावट आधार कार्ड बनवून सिम कार्ड अॅक्टिव्ह करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, आणखी सात आरोपी फरार आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. शेरू चंद्रबाली चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.

‘असा’ झाला पर्दाफाश

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे बोगस कॉल सेंटर सुरु होते. या कॉल सेंटवर यूपी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी सर्व सिम कार्ड जप्त केले. सिम कार्डची माहिती घेतली असता यातील 123 सिमकार्ड मुंबईतील असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी 99 सिमकार्ड दहिसर पश्चिमेतील ओम साई मोबाईल सेंटरमधून अॅक्टिव्हेट करण्यात आले होते.

यूपी पोलिसांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली. यानंतर एअरटेल कंपनीच्या नोडल ऑफिसरने MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एमएचबी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीने दहिसर पश्चिम ओम साई मोबाईलवरून सिमकार्ड सक्रिय करणाऱ्या आरोपीला अटक केली. या प्रकरणात आणखी सात जण सहभागी असून, ते अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध एमएचबी पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

नगरमध्ये हत्यारांसह टोळीला अटक

अहमदनगरमधील मुकुंदनगर परिसरातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून अटक केली आहे. एका तलवारीसह 11 रॅम्बौ असा 12 हत्यारांचा साठा पोलिसांनी जप्त केला. शहरातील भिंगार नाला परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. कारवाईत 3 जणांना अटक तर दोघे जण फरार झाले आहेत. साबीर शेख, अझहर शेख आणि समी शेखला अटक करण्यात आली आहे. तिघांवर 4/25 आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.