Borivali: धावत्या लोकलची शिक्षिकेला धडक, त्यानंतर पाणी पाजलं, पण…

| Updated on: Jan 13, 2023 | 10:19 AM

नालासोपारा येथे राहणाऱ्या 35 वर्षीय शिक्षका बोरिवली रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडत होत्या. त्यावेळी त्यांना ट्रेनची जोराची धडक बसली. त्यानंतर तिथल्या काही महिलांनी शिक्षिकेला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला.

Borivali: धावत्या लोकलची शिक्षिकेला धडक, त्यानंतर पाणी पाजलं, पण...
अपघाती महिला शिक्षिकेचा मृत्यू
Image Credit source: twitter
Follow us on

बोरीवली : कामावर जायला उशिर झाल्यानंतर अनेकजण धावत जाऊन प्रवास करतात. परंतु हा धावता प्रवास करीत असताना आपल्या आजूबाजूच्या वाहनांची आणि आपली काळजी घ्यायला विसरतात. आतापर्यंत रेल्वे (Railway Accident) पकडताना अनेकांचा मृत्यू (Death) झाला आहे. त्याचबरोबर रोज असे अपघात घडतात. बोरिवलीत (Borivali) एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला. त्या नालासोपारा (Nalasopara) परिसरात राहत होत्या. जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि राहत असलेल्या परिसरात समजली, त्यावेळी हळहळ व्यक्त करण्यात आली.

नेमकं काय झालं

नाला सोपारा येथे राहणाऱ्या 35 वर्षीय शिक्षका बोरिवली रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडत होत्या. त्यावेळी त्यांना ट्रेनची जोराची धडक बसली. त्यानंतर तिथल्या काही महिलांनी शिक्षिकेला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला.

सीसीटिव्हीमध्ये काय दिसतंय

विरारला जाणारी फास्ट लोकल बोरिवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून निघाली आहे. त्याचवेळी आरडाओरडा झाल्याने काही लोकांनी पाठीमागे वळून पाहिले. त्यावेळी एका महिलेला ट्रेनची जोराची धडक बसली होती. तेवढ्यात दोन महिलांनी शिक्षिकेला मागे ओढले आणि पाणी पाजले. ही घटना 10 जानेवारीला घडली होती. त्यानंतर शिक्षिकेवरती उपचार सुरु होते.

हे सुद्धा वाचा

शिक्षिकेची थोडक्यात माहिती

प्रगती नावाची महिला शिक्षिका नालासोपारा कळंब गावातील रहिवासी होती. नालासोपारा मधील एका 35 वर्षीय शिक्षिकेचा बोरिवली स्थानकात रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. प्रगती या एका इंग्रजी शाळेत शिक्षिका होत्या. नालासोपारा कलंब गाव इथे राहणाऱ्या प्रगती अशोक घरत सकाळी घाई गडबडीत धावती लोकल पकडायला गेल्या असता, तोल जाऊन लोकल व फलाटाच्या मधी सापडल्या आणि तिथेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.