वडिलांच्या घरी गेली, त्यावेळी विवाहितेला त्याच्यापासून दिवस गेले, आणि मग एक दिवस अचानक…..

| Updated on: Jul 06, 2023 | 10:50 AM

याच प्रेमावर विश्वास ठेऊन तिने तिचं सर्वस्व त्याला दिलं. रामबिरी तिच्या वडिलांच्या घरी आली. त्याचवेळी आदेश तिच्या आयुष्यात आला. दोघे जवळ कसे आले? नेमकं काय घडलं?

वडिलांच्या घरी गेली, त्यावेळी विवाहितेला त्याच्यापासून दिवस गेले, आणि मग एक दिवस अचानक.....
Rambiri
Follow us on

मेरठ : नवऱ्याशी पटत नव्हतं, म्हणून ती आई-वडिलांच्या घरी रहायला गेली. त्याचवेळी आदेशने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. सुरुवातीला ओळख झाली. पुढे ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. याच प्रेमावर विश्वास ठेऊन तिने तिचं सर्वस्व त्याला दिलं. दोघांमध्ये शरीरसंबंध सुरु झाले. त्यातून रामबिरी गर्भवती राहिली. रामबिरीच विनोद बरोबर 2015 मध्ये लग्न झालं होतं.

पण नवऱ्याशी म्हणजे विनोद बरोबर तिचं पटत नव्हतं. त्यामुळे वर्षभरात दोघे वेगवेगळे राहू लागले. रामबिरी तिच्या वडिलांच्या घरी आली. त्याचवेळी आदेश तिच्या आयुष्यात आला. या प्रेम कहाणीचा शेवट खूप धक्कादायक झाला.

नेमकं काय घडलं?

तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील शेतामध्ये रामबिरीचा मृतदेह आढळला. ती गर्भवती होती. पोलिसांनी या प्रकरणात तिचा प्रियकर आदेश आणि चौघांना अटक केलीय. मी मित्रांच्या मदतीने मिळून रामबिरीची दगडाने ठेचून हत्या केली, असं आदेशने पोलिसांना सांगितलं. रामबिरीची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह शेतात सोडला व तिथून पळ काढला.

आदेशने हे का केलं?

रामबिरीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना तिची हत्या झाल्याच म्हटलं होतं. रामबिरी आदेशपासून गर्भवती होती. त्यामुळे ती लग्नासाठी मागे लागली होती. रामबिरीच्या सततच्या या मागणीला कंटाळून आदेशने तिच्या हत्येचा कट रचला. आदेशने मित्रांसोबत मिळून हत्येचा कट रचला.

पोलिसांनी काय सांगितलं?

2 जुलैला रामबिरी आदेशला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती. आदेशनेच तिला बोलावल होतं. त्यावेळी मित्रांच्या मदतीने आदेशने तिची हत्या केली. रामबिरीची 2 जुलैला हत्या केली. दुसऱ्यादिवशी तिचा मृतदेह शेतात आढळून आला. महिला आणि आरोपी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असं पोलिसांनी सांगितलं. दीपक, आर्यन, संदीप आणि रोहित अशी अन्य चार आरोपींची नाव आहेत. सर्व आरोपी पोलीस कोठडीतून असून त्यांची चौकशी सुरु आहे.