संभाजीनगर : संभाजीनगर परिसरात (sambhaji nagar) काल एक दुर्देवी घटना घडली. त्यामध्ये मुलाचा जागीचं (boy death) मृत्यू झाल्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलाचे आई-वडील काही कामानिमित्त हैदराबादला गेले होते. त्यामुळे त्यांनी मुलाला त्यांच्या आजी-आजोबांकडे ठेवलं होतं. मुलगा खेळत असताना लिफ्टमध्ये (building lift) गेला अशी माहिती मिळाली आहे. त्या मुलाचं नाव साकीब असं असून तो १३ वर्षाचा होता. ही घटना झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुलाचा जागीचं मृत्यू झाल्यानंतर तिथं असलेल्या लोकांना सुध्दा धक्का बसला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
खेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक दरवाजा बंद होऊन 13 वर्षांच्या मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झाला. साकीब सिद्दिकी इरफान सिद्दिकी असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना इतकी भीषण होती, की गेटमध्ये मुलाचा अर्ध्यापेक्षा अधिक गळा कापला गेला. साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते.
रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला.त्यातचं खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली. परंतु, दरवाजा बंद झाला आणि बाहेर पाहताना त्याचा गळाच दरवाजात अडकला गेला. घटनेनंतर जोरात आवाज झाला. रक्ताच्या अक्षरशः धारा उडाल्या. इमारतीतील सर्व रहिवाशांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना घटना कळताच त्यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. त्यानंतर साकीबचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला.
ही घटना झाल्यापासून अनेकांना त्याचा धक्का बसला आहे. त्याबरोबर मुलाच्या आईवडिलांना शॉक बसला आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.