लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबात प्रचंड खळबळ उडाली आहे. नवरदेवाच्या कुटुंबियांकडून या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच त्यांनी रागात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती संपूर्ण राज्यात पोहोचली आहे. बरेली जिल्ह्यात तर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे.
संबंधित नवरदेव हा एका फुटवेअर दुकानात काम करतो. नवरदेव-नवरी हे दोघं एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. दोन्ही कुटुंबांच्या चर्चेनंतर त्यांचं लग्नाचं निश्चित झालं. त्यानुसार दोघांचं लग्नही पार पडलं. पण लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरीच्या पोटात दुखायला लागलं. नवरीचे सासरचे तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टराने मुलीची तपासणी करुन जी माहिती दिली त्यानंतर तिच्या सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दहा दिवसांपूर्वीच घरात आलेल्या नव्या नवरीच्या पोटात आठ महिन्यांचं बाळ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. संबंधित माहिती मिळाल्यानंतर सासरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्यासोबत फसवणूक झाली, अशी भावना त्यांच्या मनात आली. या दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी संबंधित परिसरात पसरली. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी नवरी आठ महिन्यांची गर्भवती कशी असू शकते? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला.
परिसरातील काही नागरिकांनी नवरदेव तरुण आणि नवरी यांच्यात लग्नाआधीच प्रेमसंबंध होते, असा दावा केला. पण नवरदेव तरुणाने तो दावा फेटाळला. दुसरीकडे नवरदेवाचे कुटुंबिय चांगलेच संतापले आहेत. तरुणीचं लखनऊचा निवासी असलेल्या तिच्या बहिणीच्या दिरासोबत प्रेमसंबंध होते. त्याचाच मुलगा तिच्या गर्भात आहे, असा आरोप सासरच्यांनी केला आहे. तसेच तरुणी त्याच्यासोबतच तिचं लग्न करण्यास इच्छूक होती. पण तिच्या आई-वडिलांनी दबाव टाकून तिचं दुसरीकडे लग्न लावून दिलं, असाही आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांनी केला आहे.
तरुणी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी इच्छूक होती. पण तिचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत लग्न लावून दिलं. आता आम्ही या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नवरदेव असलेल्या तरुणाने दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर पोलीस अधिकारी आशिष प्रताप सिंह यांनी प्रतक्रिया दिली. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुलीचे मेडीकल तपासणीचे देखील निर्देश आले आहेत. त्यामुळे खरं-खोटं समोर येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
पुण्यात युवा बिल्डरची अपहरणानंतर हत्या, मृतदेह विहिरीत, शिरुरवासियांचा कँडल मार्च