एक घर, दोन वधू, पण … लागण्याआधीच एक लग्न मोडलं ! भरमंडपात वधूचा लग्नास नकार

| Updated on: Jun 28, 2023 | 11:14 AM

त्या दिवशी लग्नघर गजबजलं होतं.. एकाच घरातील दोन्ही मुलींच लग्न लागणार होतं. वरातही दारात आली, पण ऐनवेळेस एका मुलीने लग्न करण्यास थेट नकारच देऊन टाकला. त्यामुळे वधूला न घेताच वरात परत गेली. तिथे असं नेमकं काय झालं ?

एक घर, दोन वधू, पण ... लागण्याआधीच एक लग्न मोडलं ! भरमंडपात वधूचा लग्नास नकार
Follow us on

लखनऊ : एकाच दिवशी दोन्ही मुलींची लग्न असल्याने ते घरं पूर्ण गजबजलं होतं. संपूर्ण वातावरणात उत्साह होता. घरासमोर वरातही आली. पण ऐन वेळेस घडलेल्या एका घटनेने संपूर्ण सोहळ्याला गालबोट लागले. वादामुळे एका मुलीने लग्न करण्यास नकार दिला (marriage broken) आणि वधूला न घेताच एक वरात परत गेली.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली. येथील जाजुमाई गावातील जसराणा येथील रहिवासी राधेश्याम राजपूत यांनी आपल्या दोन्ही मुलींचे लग्न एकत्र करण्याचे निश्चित केले. सोमवारी रात्री दोघींचेही वर त्यांच्या कुटुंबियासह वरात घेऊन घरीही पोहोचले. एक वर साईपूर येथील तर दुसऱ्याचे कुटुंब नागला इम्लिया येथील होते.

दोन्ही वरांचे औक्षण करून आत घेण्यात आले. वर-वधूंनी एकमेकांना वरमालाही घातल्या, मात्र तेवढ्यात सायपूर येथील वराच्या कुटुंबियांचा आणि वधूकडील मंडळीचा काही कारणावरून वाद झाला. हे भांडण इतकं वाढलं की दोन्हीकडच्या लोकांमध्येही सरळ मारामारीच सुरू झाली. हे सर्व पाहून एक वधू भडकली आणि तिने सरळ लग्न करण्यास नकारच दिला. माझ्या घरच्यांना मारहाण करणाऱ्या लोकांशी मला काहीच संबंध ठेवायचा नाही असे तिने स्पष्ट केले. हा वाढता वाद पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले.

वधूशिवाय परतली वरात

यानंतर वर आणि वधूच्या कुटुंबातील काही लोक पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांची समजूत घालत, शांतपणे लग्न करण्याचा सल्लाही दिला. मात्र मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे वधूकडील मंडळू खूपच संतापली होती. काहीही झालं तरी आम्ही आमची मुलगी यांच्यासोबत पाठवणार नाही, आम्हाला हे लग्न करायचंच नाही या निर्णयावर ते ठाम राहिल्याने वराकडील मंडळी वधूला न घेताच रिकाम्या हाताने परत गेले.