डीजेवाले बाबू मेरा गाना… एका गाण्यावरून महाभारत .. वाजतगाजत आलेली वरात परत गेली !

| Updated on: Jun 28, 2023 | 10:26 AM

लग्नसोहळ्यासाठी वाजत गाजत वरात आली. पण त्यानंतर असं काही घडलं की वधूने लग्न करण्यासच नकार दिला आणि वरात तशीच परत गेली. त्या लग्नात नेमकं काय घडलं ?

डीजेवाले बाबू मेरा गाना... एका गाण्यावरून महाभारत .. वाजतगाजत आलेली वरात परत गेली !
Follow us on

चित्रकूट : नववधूला घेऊन जाण्यासाठी वर आणि त्याचे कुटुंबिय वाजत गाजत वरात घेऊन तर आले. पण एका शुल्लक गोष्टीमुळे लग्नघराचे रणांगणात रुपांतर झालं आणि भडकलेल्या नवरीने सरळ लग्न करण्यासच नकार दिला. मग काय , वधूला न घेताच वरात परत गेली. चित्रकूट जवळ हा प्रकार घडला. त्या लग्नात नेमकं असं काय झालं ?

सुरोंधा गावात ही घटना घडली. शिवलाल यांच्या मुलीचे लग्न रैपुरा गावातील अजयशी ठरले होते. वर आणि त्याचे कुटुंबिया नाचत गात आले , त्यांचे औक्षणही झाले. तेवढ्यात वरपक्षातील काही लोकांनी डीजेला त्यांच्या आवडीचे गाणं लावण्यास सांगितलं आणि त्यावरूनच त्यांच्यात वादावादी झाली. नशेत असलेल्या काही लोकांनी डीजेवाल्यांना मारहाण करण्यासही सुरूवात केली. ते पाहून वधूकडची काही मंडळी, तिचे भाऊ मध्ये पडले आणि डीजे वाल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.

पण वराकडच्यांनी वधूच्या भावांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली, त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. हे पाहून वधूकडच्या लोकांनी पोलिसांना बोलावून याची माहिती दिली. वर आणि वधूकडील दोन्ही लोकांना पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. वधूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर वराकडील मंडळींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला.

वधूचे पिता शिवलाल यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीचे अजय याच्याशी लग्न ठरले होते. मात्र लग्नात ऐनवेळेस 21 हजार रुपयांची (हुंडा) मागणी करण्यात आली. ती पूर्ण न झाल्याने वराचे कुटुंबिय रागावले आणि काहींनी जेवणात चुका काढण्यास सुरूवात केली तर काहींनी वधूच्या नातेवाईकांशी वादावादी करत त्यांना शिवीगाळ केली.

एवढंच नव्हे तर गाण्यावरून डीजेशी वाद घालत आधी त्याला आणि नंतर वधूच्या भावंडानांही मारहाण करण्यात आल्याचे वधूच्या वडिलांनी नमूद केलं. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले. हे सर्व पाहता वधूने आणि तिच्या वडिलांनीही अशा लोकांसोबत लग्न लावून देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर वधूला न घेताच वराकडची मंडळी परत गेली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी वरपक्षाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.