कोची : केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय मॉलमध्ये महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा घालून त्याने प्रवेश केला. यानंतर तो फोनद्वारे चित्रीकरण करत असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. लुलू मॉलमध्ये बुधवारी ही घटना घडली. आरोपी हा बी.टेक-ग्रॅज्युएट आहे. या कृत्यामुळे त्याच्यावर कलम 354C, 419 आणि कलम 66E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी एका आयटी कंपनीत काम करत असून बुधवारी तो बुरखा घालून लुलू मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये शिरला. यानंतर त्याने येथे आपला मोबाईल फोन ठेवला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपला फोन एका छोट्या ‘कार्डबोर्ड बॉक्स’मध्ये ठेवला होतो. त्याला एक छिद्र केले होते. ज्यामुळे तो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याने याआधीची अशी कृत्ये केली आहेत का याची चौकशी पोलीस करत आहेत.
महिलांनी देखील सार्वजनिक ठिकाणी अधिक सावध राहिलं पाहिजे. कारण असे समाजकंठक कुठे ही असू शकतात. आपल्या या वाईट कृत्यांमुळे ते माणुसकीला काळीमा फासतात.