सेक्स केल्यानंतर भांडले, समलैंगिक संबंधातून अखेर नको ते घडलं

| Updated on: Mar 07, 2023 | 11:41 AM

तीन वर्षांपूर्वी जीममध्ये त्याची बिझनेसमनसोबत ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली, त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये होते. बिझनेसमनने 22 फेब्रुवारीलाच दुसर लग्न केलं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत.

सेक्स केल्यानंतर भांडले, समलैंगिक संबंधातून अखेर नको ते घडलं
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला संपवले
Follow us on

बंगळुरु : म्हैसूर रोडवरील नयनदहल्ली येथील एका जुन्या इमारतीत बिझनेसमन 28 फेब्रुवारीला मृतावस्थेत आढळला. या हत्या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे. या बिझनेसमनची त्याच्या समलैंगिक जोडीदारानेच हत्या केली. बिझनेसमनचा जोडीदार 26 वर्षांचा असून त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने बिझनेसमनला संपवलं. त्याने बिझेनसमनची डोक्यात हातोडा घालून हत्या केली. त्याच्या पोटात कैची घुसवली. तपास करणाऱ्या पोलिसांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. मृत बिझनेसमनने 22 फेब्रुवारीलाच दुसर लग्न केलं होतं. त्याच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. चंद्र लेआऊट येथे तो रहायला होता.

हत्या झाल्याच कधी समजलं?

28 फेब्रुवारीला पहाटे 2 च्या सुमारास बिझनेसमॅनला त्याच्या 17 वर्षीय मुलाने मृतावस्थेत पाहिलं. मुलगा त्याच्या वडिलांचा शोध घेत होता. त्यांचा जाहीरात, प्रिटिंगचा व्यवसाय होता. वडिल घरी परतले नाही, म्हणून त्याने रितसर पोलिसात तक्रार नोंदवली. तिघांवर त्याने संशय व्यक्त केला होता. यात आरोपीच नाव सुद्ध होतं. हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा संशय त्याने व्यक्त केला होता.

रिलेशनशिप कधी सुरु झाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजे नगरमध्ये राहणारा आरोपी बांधकाम क्षेत्रात काम करतो. तीन वर्षांपूर्वी जीममध्ये त्याची बिझनेसमनसोबत ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली, त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

सेक्स केल्यानंतर भांडण कशावरुन झालं?

पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा घडला त्यादिवशी दोघे बिझनेसमनच्या जुन्या इमारतीत भेटले. आधी दोघांनी सेक्स केला. त्यानंतर ब्रेक-अपच्या मुद्यावरुन त्यांच्यात कडाक्याच भांडण झालं. आरोपीला हे नात संपवून नव्याने आयुष्याची सुरुवात करायची होती. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी बघितली होती. त्याला लग्न करायच होतं. पण बिझनेसमनचा अफेअर संपवण्याला विरोध होता. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये यावरुन वाद सुरु होता.

हत्या केल्यानंतर झोपेच्या गोळ्या घेतल्या

बिझनेसमन ऐकत नाहीय हे लक्षात आल्यानंतर आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने हत्या केली. त्यानंतर आरोपी रात्री 11 च्या सुमारास घरी आला. त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. दुसऱ्यादिवशी आरोपीला त्रास होत होता. म्हणून वडिल त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी तक्रार नोंदवली. सोमवारी आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.