धक्कादायक, कपिल शर्मा शोमध्ये काम देतो सांगून नालासोपाऱ्यात विवाहित महिलेवर बलात्कार 

| Updated on: May 24, 2024 | 8:12 AM

Crime news : प्रसिद्ध कॉमेडी शो मध्ये काम मिळवून देतो सांगून एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने ऑडिशनसाठी महिलेला घरी बोलावलं होतं. ऑडिशन पसंत पडली, तर कास्टिंग डायरेक्टरकडे घेऊ जाईन असा त्याने शब्द दिला.

धक्कादायक, कपिल शर्मा शोमध्ये काम देतो सांगून नालासोपाऱ्यात विवाहित महिलेवर बलात्कार 
crime
Follow us on

बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्टरच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं आरोपीने पीडित महिलेला आश्वासन दिलं होतं. एका परिचयाच्या मित्राच्या माध्यमातून आरोपीची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती. त्याने महिलेला ऑडिशनसाठी बोलावल होतं. आपण कास्टिंग टीमचा भाग आहोत. अनेक लोकप्रिय टीव्ही शोसाठी आपण कास्टिंगच काम केलय, असं आनंद सिंहने महिलेला सांगितलं. कपिल शर्मा शोमध्ये काम मिळवून देतो, असं त्याने पीडित महिलेला सांगितलं. आनंद सिंहने महिलेला ऑडिशनसाठी त्याच्या घरी बोलावलं. ऑडिशन पसंत पडली, तर कास्टिंग डायरेक्टरकडे घेऊ जाईन असा त्याने शब्द दिला.

रोलसाठी महिला ऑडिशन द्यायला तयार झाली. मंगळवारी महिला आनंद सिंह राहत असलेल्या नालासोपाऱ्यातील त्याच्या घरी गेली. आरोपी आनंद सिंह त्यावेळी ऑडिशनपेक्षा जवळीक साधण्याचा जास्त प्रयत्न करत होता, हे पाहून मला धक्का बसला असं पीडित महिलेने म्हटलं आहे. महिलेने जेव्हा त्याला नकार दिला. तेव्हा आनंद सिंहने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला ढकललं. त्यावेळी त्याने तिच्या कानशिलात लगावली व मारहाण केली. पोलिसांकडे गेलीस, तर ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिला विवाहित आहे.

मारहाण करून, घरात कोंडून ठेवले

आरोपीने पीडित महिलेला मारहाण करून, घरात कोंडून ठेवले होते. पीडित महिलेने पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करून मदत मागितल्यावर पोलिसांनी तिची सुटका केली. महिलेने मंगळवारी तुळीज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी विरोधात 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी उद्देश) या कलमांखाली गुन्हा नोंदवला.

आरोपीने काय सांगितलं?

“आरोपी आनंद सिंहला पोलिसांनी अटक केली असून त्याने आपण कलाकार असल्याचा दावा केला आहे. मी कास्टिंग डायरेक्टरसाठी काम करतो असं त्याने सांगितलं” पोलीस उपनिरीक्षक रोहिनी डोके यांनी ही माहिती दिली.