Car On Footpath | दृश्य विचलित करणारे, भरधाव वेगाने कार फूटपाथवर! अपघाताचा Video Viral

| Updated on: Oct 20, 2023 | 12:33 PM

चोरीचे, अपघाताचे व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले हे व्हिडीओ प्रत्येक वेळी काहीतरी वेगळाच प्रकार घेऊन येतात. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. या व्हिडीओ मध्ये एक मोठा रस्ता दिसेल. या कॅमेऱ्यात सर्वात आधी फुटपाथ दिसेल. फुटपाथवरून इथे काही लोक जात आहेत. रियल इस्टेटचा व्यवसाय असणाऱ्या कमलेश बलदेव असं कारचालकाचं नाव आहे. अपघातानंतर कमलेश कार शोरूम जवळ सोडून पळून गेला.

Car On Footpath | दृश्य विचलित करणारे, भरधाव वेगाने कार फूटपाथवर! अपघाताचा Video Viral
accident video
Image Credit source: Social Media
Follow us on

बंगळूर: सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. लोक सुद्धा या प्लॅटफॉर्मचा चांगलाच फायदा घेतात. यावर कधी डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात, कधी गाण्याचे, कधी मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी कसले. मजेशीर व्हिडीओ जितके पाहायला मिळतात तितकेच इथे धक्कादायक व्हिडीओ सुद्धा पाहायला मिळतात. हे व्हिडीओ लोकांना आवडले की ते तितक्याच प्रमाणात शेअर सुद्धा केले जातात. तुम्ही देखील खूप वेळा अपघाताचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. असेच आपल्याला चोरीचे व्हिडीओ बघायला मिळतात. चोरीचे, अपघाताचे व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले हे व्हिडीओ प्रत्येक वेळी काहीतरी वेगळाच प्रकार घेऊन येतात. आता हा व्हिडीओ अपघाताचा आहे. यात चारचाकीवाला डायरेक्ट फुटपाथवरच गाडी घेऊन गेलाय.

अचानक मागून चारचाकी येते

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. या व्हिडीओमध्ये एक मोठा रस्ता दिसेल. या कॅमेऱ्यात सर्वात आधी फुटपाथ दिसेल. फुटपाथवरून इथे काही लोक जात आहेत. यात 4-5 मुली चालत जाताना दिसतील. सगळं काही सुरळीत सुरु असताना इथे अचानक मागून चारचाकी येते आणि या मुलींना उडवते. हे दृश्य बघून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ कर्नाटक मधला आहे. घटना 18 ऑक्टोबरला घडलीये. मागून येणारी ही कार मुलींना तर उडवतेच पण एकीला अक्षरशः फरपटत नेते. अजून धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अपघात होतो त्यानंतर ही कार थांबत सुद्धा नाही.

आरोपी ताब्यात

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार या अपघातात 5 महिला जखमी झालेल्या आहेत. त्यापैकी एकीचा मृत्यू झालाय, उर्वरित 4 जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रियल इस्टेटचा व्यवसाय असणाऱ्या कमलेश बलदेव असं कारचालकाचं नाव आहे. अपघातानंतर कमलेश कार शोरूम जवळ सोडून पळून गेला. त्यांनतर त्याच्या वडिलांसह त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झालाय.