Pune crime | पुण्यात फसवणूक प्रकरणी तीन नामांकित बिल्डरवर गुन्हा दाखल

| Updated on: Dec 07, 2021 | 4:24 PM

भुंडे यांनी या विरोधात वेळोवेळी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. भुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा गुन्हा गंभीर आणि दखलपात्र असल्याचे सांगत न्यायालयाने, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

Pune crime | पुण्यात फसवणूक प्रकरणी तीन नामांकित बिल्डरवर गुन्हा दाखल
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे – अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेत, फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तीन नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र बाळानाथ भुंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

काय आहे आरोप

संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे बावधन येथील पेब्बल अरबनिया या बांधकाम प्रकल्प आहे. यात प्रकल्पात फिर्यादी राजेंद्र भुंडे हे मूळ जागा मालक आहेत. त्यांनी येवले, शेंडे आणि नहार यांच्या एएसआर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मला पेब्बल ‘अरबनिया’ या गृह प्रकल्पासाठी काही जागा दिली आहे.  या प्रकल्पाच्या जवळ भुंडे यांची दुसरी पाच गुंठे जागा आहे. हि जागा त्यांनी येवले यांना दिलेली नाही. मात्र, या जागेतून येवले यांनी बेकायदा रस्ता बनवल्याचे भुंडे यांचे म्हणणे आहे.

पीएमआरडीएची देखील फसवणूक 

या गुन्ह्यातील एक आरोपी शाम शेंडे यांनी शासकीय कागदपत्रात काही ठिकाणी स्वःताच्या नावाचा शाम वाणी असा उल्लेख केला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी दोन वेगवेगळी नावे वापरली असल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे. भुंडे यांनी या विरोधात वेळोवेळी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. भुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा गुन्हा गंभीर आणि दखलपात्र असल्याचे सांगत न्यायालयाने, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

उस्मानाबादेत एसटी बसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्तातही बसच्या काचा फोडल्या

Mumbai : महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र, आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार

Breaking | ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून पदाचा गैरवापर, कुणाल राऊतांनी भाजपचे आरोप फेटाळले