चेन्नई : वाहन चोरीच पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या एका महिलेला धक्कादायक अनुभव आला. तपासात पोलिसाने महिलेला सहकार्य करण अपेक्षित होतं, पण उलट तो पोलीसच नको ते बोलून गेला. 14 फेब्रुवारीला महिलेच्या दुचाकीची चोरी झाली. तिने या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पुडूपेट येथे दोन दिवसांनी महिलेची दुचाकी सापडली.
गुरुवारी या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल निलंबित झाला. महिलेने तिचा चेहरा बुरख्याने झाकला होता. हा बुरखा हटवण्यासाठी तो महिलेला त्रास देत होता. तक्रारदार महिलेला पोलिसांनी सहकार्य करण अपेक्षित होतं. पण उलट पोलीसवालाच तिला त्रास देत होता. तामिळनाडूच्या चेन्नईमधील हे प्रकरण आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
वेलमुरुगन तिला घाबरवत होता.
गुन्ह्याची नोंद झालीय. त्यामुळे हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन फातिमाला स्कूटर कोर्टात आणायला सांगत होता. पण फातिमा तयार नव्हती. वेलमुरुगन तिला घाबरवत होता. त्यामुळे तिला रडू कोसळलं. त्यावेळी मुरुगन फातिमाला म्हणाला की, “रडताना तू खूप सुंदर दिसतेस. बुरखा हटव, त्यामुळे तुझा चेहरा दिसत नाही” त्यानंतर फातिमाने मुरुगन विरोधात तक्रार नोंदवली. अखेर मुरुगनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.