21 कोटींचा घोटाळा प्रकरणातील फरार आरोपीला दिल्लीत अटक, आई-वडीलही ताब्यात

| Updated on: Jan 02, 2025 | 7:48 AM

Crime News: घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर व त्याची मैत्रीण फरार होती.आर्थिक गुन्हे शाखेने हर्षकुमारची मैत्रिणी आरोपी अर्पिता वाडकर हिला दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतून अटक केली होती. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

21 कोटींचा घोटाळा प्रकरणातील फरार आरोपीला दिल्लीत अटक, आई-वडीलही ताब्यात
हर्षकुमार
Follow us on

Crime News: छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल समितीत 21 कोटी 51 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला कंत्राटी लिपिक हर्षकुमार क्षीरसागर यांनी आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची वडील अनिल क्षीरसागर आणि आई मनिषा क्षीरसागर यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याच्या मैत्रिणीला गुन्हे शाखेने मुंबईतून अटक केली होती. हर्षकुमार याच्या शोधासाठी आठ पथके स्थापन केली होती.

छत्रपती संभाजीनगरात २१ डिसेंबर रोजी क्रीडा संकुल घोटाळा उघड झाला. कंत्राटी काम करणाऱ्या हर्षकुमार यांने संकुलनासाठी मिळणारा कोट्यवधीचा निधी ११ महिन्यांमध्ये लंपास केला. त्यातून त्याने फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित दागिने खरेदी केले. परदेश वारी केली. हे प्रकरण उघड होताच हर्षकुमार आणि त्याचे आई-वडील फरार झाले होते.

सोने खरेदीच्या पावत्या

घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर व त्याची मैत्रीण फरार होती.आर्थिक गुन्हे शाखेने हर्षकुमारची मैत्रिणी आरोपी अर्पिता वाडकर हिला दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतून अटक केली होती. तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

घोटाळा प्रकरणात उपसंचालकाच्या कार्यालयात पोलिसांनी झाडाझडती करून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले. त्यानंतर या कार्यालयाला सील ठोकले. हर्षकुमार याच्या फ्लॅटमध्ये एक पैसे मोजण्याची मशीन मिळून आले. शिवाय त्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याच्या पावत्या देखील पोलिसांच्या हाती लागल्या.

मास्टरमाइंड दुसरेच असल्याचा दावा

दरम्यान, हर्षकुमार याने अटक होण्यापूर्वी पोस्टाने एक तक्रार पाठवली होती. ती तक्रार त्याचे वकील ॲड. रामेश्वर तोतला यांनी न्यायालयात वाचली. या तक्रारीत क्रीडा उपसंचालक संजय सबनीस आणि बँक मॅनेजर हेच घोटाळ्याचे मास्टरमाइंड असल्याचे म्हटले. या लोकांनी हर्ष कुमार याला पिस्तूलचा धाक दाखवून हे करून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.