विहिरीच्या पाण्याचा वाद, एकाच कुटुंबात तुफान हाणामारी, बाप-लेक अन् पुतण्याचा मृत्यू

| Updated on: Jan 06, 2025 | 7:16 PM

Crime news: काळे कुटुंबात झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येरमाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

विहिरीच्या पाण्याचा वाद, एकाच कुटुंबात तुफान हाणामारी, बाप-लेक अन् पुतण्याचा मृत्यू
क्राईम न्यूज
Image Credit source: social media
Follow us on

Crime news: धाराशिव जिल्ह्यातील बावी येथील खळबळजनक घटना समोर आली आहे. जो वाद समजुतीने सोडवता आला असता त्या वादावरुन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. त्या हाणामारीत कुटुंबातील बाप-लेक आणि पुतण्याचा मृत्यू झाला. विहिरीच्या पाण्याच्या वादावरुन ही हाणामारी झाली. कुटुंबातील लोकांनीच हाणामारीत कोयते, दगड, काठ्यांचा वापर करत एकमेकांची डोकी फोडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चौथा व्यक्ती गंभीर जखमी आहे.

काय घडला प्रकार

वाशी तालुक्यातील बावी येथे पारधी समाजातील काळे कुटुंब राहतात. या दोन भावांच्या कुटुंबातील शेतासाठी एकच विहीर होती. त्या विहिरीचा वापर दोन्ही कुटुंब करत होते. परंतु त्यांच्यात हा वादाचा विषय होता. रविवारी रात्री त्यांच्यात विहिरीचे पाणी वापरण्यावरुन वाद पुन्हा पेटला. त्यामुळे काळे कुटुंबातील सदस्य आमनेसामने आले. वाद जास्त पेटल्यामुळे त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. त्यात कत्ती-कोयते, दगड, काठी यांचा वापर करण्यात आला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. आप्पा काळे आणि परमेश्वर काळे मृत बापलेकांची नावे आहेत. तर दुसऱ्या गटातून त्यांचा पुतण्या सुनील काळे याचा देखील मृत्यू झाला.

दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

काळे कुटुंबात झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येरमाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

महिला गंभीर जखमी

काळे कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात त्या विहिरीवरुन नेहमी वाद होत असल्याचे गावातील लोकांनी सांगितले. परंतु रविवारी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यात तिघांनी आपला जीव गमावला. त्यात अप्पा काळे (वय ६५ वर्ष), सुनील काळे (वय २० वर्ष), परमेश्वर काळे (वय २२ वर्ष) या तिघांचा मृ्त्यू झाला. तसेच वैजाबाई काळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.