Video : सबसे कातिल गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलिसात तक्रार, पहिल्यांदाच असं का घडलं?; काय आहे प्रकरण?

| Updated on: May 15, 2023 | 8:41 PM

आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Video : सबसे कातिल गौतमी पाटील हिच्याविरोधात पोलिसात तक्रार, पहिल्यांदाच असं का घडलं?; काय आहे प्रकरण?
गौतमी पाटील
Follow us on

सोलापूर : आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्यांदाच गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने गौतमीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे.

नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच बार्शी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. गौतमी पाटील हिने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अवांतर मानधन घेतलं

12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले. तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली, असं तक्रारदार गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हंटलय. त्यामुळे गौतमी पाटील हिची कोंडी झाली आहे.

कार्यक्रम घेणं महागात पडलं

सोलापूरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं आयोजक राजेंद्र भगवान गायकवाड यांना महागात पडलं आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती.

कागदांची पूर्तता नाही केली

कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसानी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम घेत नियमांचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.