मुंबई – वसई (Vasai) हद्दीत मालजीपाडा येथे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कंटेनर (Container) आणि टेम्पोचा (Tempo) अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा स्टेअरिंग मध्येच अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस कट्टरच्या साहाय्याने केबिन व गाडीचे स्टेरिंग कापून चालकाला सुखरूप बाहेर काढले आहे. अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पण एक रिक्षा चालक आणि कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत. आयसर टेम्पोचे टायर पंक्चर झाल्याने तो रस्त्यात उभा होता. गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या कंटेनर चालकाला रात्रीच्या वेळी उभा टेम्पो न दिसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील मुंबई आणि गुजरात महामार्गावरील वाहतूकीची दोन तास कोंडी झाली होती. वालीव व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर आणि टेम्पोला बाजूला केले. पहाटे 3 वाजणाच्या वाहतूक सुरळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताचं कारण काय
रात्री साडेबाराच्या सुमारास टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्यात उभा होता. त्यावेळी वेगाने आलेल्या कंनटेनरला टेम्पोला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची दिली की, परिसरात मोठा आवाज झाला. भयभीत झालेल्या लोकांनी मोठा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघात झाल्याची माहिती संबंधित पोलिस स्टेशन दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर चालक आतमध्ये अडकल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला अपघाताची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले.
वाहतूकीचा दोन तास खोळंबा
उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिल्याने मध्यरात्री गाड्यांची मोठी रांग पाहायला मिळाली. कंटेनर रस्त्यात असल्याने गाडी रस्त्यावरून काढताना मोठा त्रास होत होता. वालीव व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही गाड्या बाजूला हटवल्या. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास साधारण वाहतूक सुरळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.