जिग्नेश मेवाणींच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात कोर्टाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा

| Updated on: Sep 17, 2022 | 1:15 AM

2016 मध्ये गुजरात विद्यापीठाजवळ आंदोलन झाले होते. विद्यापीठात बांधण्यात येणाऱ्या कायदा भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे, अशी मागणी या लोकांनी केली होती.

जिग्नेश मेवाणींच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात कोर्टाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा
जिग्नेश मेवाणींच्या अडचणीत वाढ
Image Credit source: TV9
Follow us on

गुजरात : गुजरातमधील वडनगरमधील काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता अहमदाबाद सत्र न्यायालयाने 2016 च्या एका प्रकरणात जिग्नेश मेवाणीसह 19 जणांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासा (Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या सर्व लोकांना जागेवरच जामीन (Bail) मंजूर करण्यात आला. मेवाणी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. नंतर काँग्रेस पक्षाने त्यांना गुजरात युनिटचे कार्याध्यक्ष बनवले.

गुजरात विद्यापीठाजवळ आंदोलन प्रकरणी सुनावली शिक्षा

2016 मध्ये गुजरात विद्यापीठाजवळ आंदोलन झाले होते. विद्यापीठात बांधण्यात येणाऱ्या कायदा भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे, अशी मागणी या लोकांनी केली होती. त्यामुळे विद्यापीठ रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जिग्नेशसह 20 जणांना अटक केली होती.

एका आरोपीचा मृत्यू झाला होता

पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी अहमदाबाद येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात झाली. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सर्व 19 जणांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावली.

हे सुद्धा वाचा

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने आयपीसीच्या तीन वेगवेगळ्या कलमांतर्गत तीन वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या. एका कलमान्वये सहा महिन्यांचा तुरुंगवास, दुसर्‍या कलमान्वये 500 रुपये दंड आणि तिसऱ्या कलमान्वये 100 रुपये दंड सुनावण्यात आला.

मेहसाणा प्रकरणात 3 महिन्यांची शिक्षा झाली

या प्रकरणात जिग्नेश मेवाणीलाही जामीन मंजूर झाला आहे. याआधी जिग्नेश, सुबोध परमार आणि रेश्मा पटेल यांना मेहसाणा प्रकरणात तीन महिन्यांची शिक्षा झाली होती. परवानगी न घेता रॅली काढल्याचा आरोप करण्यात आला होता.