पत्नी सोडून गेली म्हणून 18 महिलांची केली हत्या, सीरिअल किलर हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jan 27, 2021 | 11:52 AM

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे.

पत्नी सोडून गेली म्हणून 18 महिलांची केली हत्या, सीरिअल किलर हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

हैदराबाद : तेलंगणाची (Telangana) राजधानी (Hyderabad Police) हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. इथे पोलिसांनी एका 45 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर 18 महिलांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे. (crime news telangana police arrested serial killer after 18 cases of murder of women in hyderabad)

हैदराबाद शहर पोलीस टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी आणि रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईत करत या व्यक्तीला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये आरोपी व्यक्ती हा दगड तोडण्याचं काम करतो. याआधीही त्याला 21 प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. यामधले तब्बल 16 हत्याकांड आहेत तर चार प्रकरणं मालमत्ता वादासंदर्भात असल्याचं सांगण्यात येत आहे तर एका प्रकरणात आरोपी जेलमधून फरार झाला होता.

या प्रकरमआत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 21 व्या वर्षी आरोपीचं लग्न झालं होतं. पण काही दिवसांत त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत पळून गेली. तेव्हापासून आरोपी महिलांचा द्वेष करू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2003 पासून त्याने महिलांविरूद्ध गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे. त्याने अनेक अविवाहित महिलांना लैंगिक संबंधासाठी पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांची हत्या करायचा.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे सगळं कृत्य करताना तो दारूच्या नशेत असायचा. महिलांची निर्घृणपद्धतीने हत्या केल्यानंतर आरोपी त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायचा. अशा वारंवारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा श्वास घेतला. (crime news telangana police arrested serial killer after 18 cases of murder of women in hyderabad)

संबंधित बातम्या – 

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय? जळगावची ही बातमी सावध करणारी, व्हिडीओ पाहिला अन् आयुष्य संपवलं

लग्न झालेल्या प्रेयसीसोबत बेडरुममध्ये प्रियकर, तितक्यात नवरा दारात, पुढं जे घडलं त्यानं भंडारा हादरला

(crime news telangana police arrested serial killer after 18 cases of murder of women in hyderabad)