औरंगाबादः लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने औरंगाबादमधील व्यापारी बाजारपेठा (Aurangabad Market) फुलल्याचे चित्र आहे. विविध व्यापाऱ्यांच्या दालनांमध्ये आज सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाची (Diwali Festival) तयारी सुरु आहे. यानिमित्ताने सराफा बाजारांतही सोन्या-चांदीची नाणी आणि विविध सोन्या-चांदीच्या मूर्तींची आवक झाली आहे. व्यापारीवर्ग आज लक्ष्मीपूजनासाठी खास सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे औरंगाबादेतही सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे.
औरंगाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,050 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. एकूणच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण झालेली दिसून आली. तर आज 04 नोव्हेंबर रोजी एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे नोंदले गेल्याची माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.
03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले. चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे चित्र दिसून आले. यापूर्वी 02 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,400 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही 67,500 रुपये एवढे नोंदवले गेले. 31 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले. 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.
दिवाळीच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश ग्राहक सराफ्यात शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने येत असून ते अंगठीचा वेढ, लॉकिट खरेदी करत आहेत. तर महिलांचा एक मोठा वर्ग दागिने खरेदी करण्यासाठी विविध ब्रँडच्या सुवर्णदालनांमध्ये गर्दी करत आहे. यंदा लाइटवेट सोन्याच्या दागिने महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. तर व्यापारी वर्गात भेट म्हणून देण्यासाठी सोन्या-चांदीची नाणी आणि गजलक्ष्मी किंवा गजान्त लक्ष्मीच्या मूर्ती, सोन्या-चांदीच्या लक्ष्मीच्या फ्रेम बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. कमळात वसलेल्या लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्याने गजान्त लक्ष्मीचे पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केले जाते. यानिमित्ताने बाजारात सुरेख नक्षीकाम केलेल्या सोन्या-चांदीच्या गजान्त लक्ष्मीच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत.
इतर बातम्या-