जर तुमच्याकडे जर ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप ( Amazon Prime ) आहे तर सावधा व्हा, वास्तविक एक हॅकर्स ग्रुप एमेझॉन प्राईम मेंबर्सना टार्गेट करीत आहे. हा हॅकर्सच्या ग्रुप केवळ युजरची संवेदनशील डाटाच चोरी करीत आहे असे नव्हे तर क्रेडिट डाटा चोरण्याचा देखील प्रयत्न करीत आहे. एकदा का ही माहिती हॅकर्सच्या हाती लागली तर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. चला तर पाहूयात नेमके काय प्रकरण आहे तर ?
सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शनसाठी काम करणाऱ्या पालो ऑल्टोची युनिट ४२ रिसर्च डिव्हीजनने या हॅकींग कँपेनला दुजोरा दिलेला आहे. हे सायबर हॅकर्स ॲमेझॉनची प्राईम मेंबरशिप एक्सपायर होण्याची भीती दाखवून ॲमेझॉन युजरना टार्गेट केले जात आहे. हॅकर्स ॲमेझॉनचे रिप्रेझेटिव्ह बनून युजरना एक पीडीएफ डॉक्युमेंट पाठवत आहेत. यात युजर्सच्या अकाऊंटचा डेटा आणि क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरण्यास सांगत आहेत. वास्तविक हा एक फिशींग अटॅक असतो. कारण फॉर्म भरल्यानंतर हा डेटा कंपनीकडे न जाता हॅकर्सच्या हातात जातो. या हॅकर्सनी ॲमेझॉन सारखेच दिसणारे १००० हून अधिक डोमेन नेम रजिस्टर केले आहेत. त्यामुळे युजर हा मेल किंवा मॅसेज ॲमेझॉनमधून आला असावा असे समजून युजर प्रतिसाद देत असून हॅकर्सच्या जाळ्यात अडकत आहेत.
आजकल सायबर चोरीचे प्रकार खूप वाढले आहे. हॅकर्स आणि सायबर ठग वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. यामुळे अशा सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सर्तक रहावे लागणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक, मॅसेज, इमेल वा डॉक्युमेंट ओपन करू नका. कोणताही अज्ञात व्यक्ती जर ओटीपी मागत असेल किंवा अकाऊंट डिटेल्स मागत असेल तर त्याला माहिती शेअर करु नका. तसेच सोशल मीडियावर दाखविल्या जाणाऱ्या आकर्षक जाहीराती, सूट , ऑफरना भूलुन पैसे किंवा कार्ड डिटेल्स भरु नका !