नवी दिल्ली : अल्पवयीन शाळकरी मुलींना गेल्या 3 वर्षांपासून बनावट फोटो पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या एका सराईत सायबर स्टॉकरला उत्तर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पकडलेले सायबर स्टॉकर महावीर आयआयटी महाविद्यालयातून बीटेक करत आहे, परंतु गेल्या तीन वर्षांपासून तो अनेक अल्पवयीन शाळकरी मुली आणि काही शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करत होता आणि त्याच्या माहितीचा गैरवापर करत होता.
काय आहे प्रकरण?
काही काळापूर्वी दिल्ली पोलिसांकडे तक्रार आली होती, त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना 50 हून अधिक अल्पवयीन मुली आणि शाळेच्या शिक्षिकांना स्टॉक (ऑनलाईन पाळत) केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हायटेक अॅप वापरत असत. या हायटेकच्या माध्यमातून आरोपीचा बनावट कॉलर आयडी समोरून दिसत होता.
काय होती मोडस ऑपरेंडी?
एवढेच नाही तर अल्पवयीन विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यासाठी तो व्हर्च्युअल नंबर वापरत असे. तो इतका हुशार होता की, पीडितेला कॉल करण्यासाठी तो पीडितेच्याच फोनवरून अॅपद्वारे फोन करायचा आणि व्हर्च्युअल नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज तसेच मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवायचा, मग ब्लॅकमेल करायचा.
आवाज बदलणारे सॉफ्टवेअर
उत्तर दिल्लीचे डीसीपी सागरसिंह कलसी यांनी सांगितले की, आरोपींनी अल्पवयीन मुलींचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते, जेणेकरून तो त्यांच्या ओळखीच्या इतर मुलींच्या संपर्कात येऊ शकेल आणि तो त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ऑनलाईन क्लासेससाठी सामील व्हायचा. जेव्हा तो कोणाशी बोलायचा, तेव्हा आवाज बदलणाऱ्या अॅप किंवा सॉफ्टवेअरची मदत घ्यायचा.
आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी डिजिटल फूटप्रिंटचाही अवलंब केला आणि नंतर आरोपी महावीरला पाटण्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे.
पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट
दुसरीकडे, माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट केले. हा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात घडला आहे. पत्नीच्या माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
काही महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर पती कोणतेही काम करत नव्हता. यामुळे दोघांमध्ये अनेकदा कामावर न जाण्याच्या कारणामुळे वाद होत असे. नाराज झालेल्या पत्नी वादानंतर रागात घर सोडून माहेरी निघून गेली. माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने रागात पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले.
या घटनेमुळे पत्नीच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त करत थेट आरोपी पतीच्या विरोधात तक्रार केली. तसेच या आधीही आरोपी पतीने बसस्टॉपवर पत्नी तिच्या वडिलांसह दिसताच तिच्यावर ब्लेडने वार करुन जखमी केले होते.
संबंधित बातम्या :
माझी नाहीस तर कोणाची नाहीस, इन्स्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचं एक पाऊल मागे, तरुणाचं हादरवणारं कृत्य
31 वर्षांपासून कारखाना मालकांकडून सामूहिक बलात्कार, विवाहितेची पोलिसात तक्रार
सहा महिन्यांपूर्वी लग्न, तीन महिन्यांच्या गर्भवतीचा संशयास्पद मृत्यू, भाऊ म्हणतो शेवटच्या फोनवर ती..