MS Dhoni | भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी अडचणीत सापडलाय. माजी बिजनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दासने धोनी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केलाय. 2017 सालच्या कराराच कथित उल्लंघनाच हे प्रकरण आहे. धोनी आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना मानहानीचा खटला दाखल करण्यापासून रोखाव असे निर्देश देण्याची कोर्टाकडे मागणी करण्यात आली आहे. याआधी धोनीने आपल्या दोन्ही बिजनेस पार्ट्नरवर फसवणुकीचा आरोप केला होता. क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, पण असं कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही. माझे 15 कोटी रुपये हडपण्यात आले अशी धोनीने लिखित तक्रार केली होती.
धोनीकडून 15 कोटी रुपये घेतले व 2017 सालच्या कराराच कथित उल्लंघन प्रकरणात धोनीकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय असं मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दासने याचिकेत म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अलीकडेच धोनीने दिवाकर आणि दास विरुद्ध गुन्हेगारी प्रकरण नोंदवलं. दोघांनी आपल्याला 16 कोटी रुपयाला फसवलं त्याशिवाय क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या कराराचा सन्मान केला नाही. खेळ व्यवस्थापन कंपनी आरसा स्पोर्ट्सच्या दोन संचालकांविरुद्ध रांचीच्या सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
धोनीच्या प्रतिनिधींनी काय सांगितलं?
धोनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, त्यांनी धोनीच्यावतीने रांचीच्या एका सत्र न्यायालयात अरका स्पोर्ट्सचे संचालक मिहिर दिवाकर आणि सौम्या दास विरोधात भारतीय दंड संहितेच कलम 406 (विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हेगारी खटला दाखल केलाय.