नवी दिल्ली : महिलेचा मोबाईल चोरण्याच्या प्रयत्न करताना दोघा बाईकस्वारांनी तिला दुचाकीसोबत खेचत नेले. महिला 150 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. राजधानी दिल्लीतील शालिमार बागसारख्या गजबजलेल्या परिसरात संध्याकाळच्या वेळी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं
पादचारी महिलेचा मोबाईल फोन चोरताना दोन दुचाकीस्वारांनी तिला बाईकसोबत फरफटत नेले. गुरुवार 16 डिसेंबरला दिल्लीतील शालिमार बाग भागात हा प्रकार घडला. जवळपास 150 मीटर अंतरापर्यंत तिला खेचत नेल्यानंतर चोरटे तिला रस्त्यातच सोडून पसार झाले.
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद
सुदैवाने भररस्त्यात पडल्यानंतरही तिला कुठल्याही वाहनाची धडक बसली. फूटपाथवरुन जाणाऱ्या अन्य पादचाऱ्यांनी आणि वाहन चालकांनी तिची मदत केली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीतील सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शालिमार बाग परिसरात लुटीच्या घटना
शालिमार बाग भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासून स्थानिक पोलिस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे लुटीची ही पहिलीच घटना नाही. याआधी 38 वर्षीय महिला आणि तिच्या लहानग्या मुलीवर चौघा जणांनी शालिमार बाग परिसरातच लुटीच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती.
पाहा व्हिडीओ :
A woman was dragged for around 100 meters by robbers on bike in Shalimar Bagh area of #Delhi on #16December. She is undergoing treatment at a hospital. Even after nine years of #Nirbhaya case nothing has changed interms of #WomenSafety in National capital @DelhiPolice pic.twitter.com/M9anRJLiS0
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) December 16, 2021
संबंधित बातम्या :
क्रूरतेचा कळस! चाळीस वेळा चावला, नवऱ्यानंच अंकिताचा जीव घेतला
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?