Delhi Nand Nagri crime Case : दिल्लीच्या नंद नगरीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मुस्लिम समाजातील एका युवकाने हिंदू मुलीवर गोळी झाडली. जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गोळी चालवणारा आरोपी कासिमला अटक केली आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुलगी घरात एकटी होती
सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास आरोपी कासिमने अल्पवयीन मुलीवर गोळी झाडल्याची आम्हाला माहिती मिळाली, असं दिल्ली नॉर्थ-ईस्ट ड्रिस्ट्रिक्टचे डीसीपी जॉय टिर्की यांनी सांगितलं. आरोपी गोळी झाडल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला. अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी शेजारी राहणारा कासिम तिथे आला व त्याने गोळी झाडली. ही गोळी मुलीच्या खांद्याला लागली. शेजारी मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. या मुलीच्या प्रकृतीला आता कुठलाही धोका नाहीय. कासिम एका मोबाइलच्या दुकानात नोकरी करतो. मुलीच्या शेजारीच कासिम आपल्या कुटुंबासोबत राहत होता.
मुलगी रुग्णालयात दाखल
शेजाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये अफेयर होतं. दोघे परस्परांना ओळखत होते. मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होती. त्या रागातून कासिमने मुलीवर गोळी झाडली. कासिम अनेक दिवसांपासून या मुलीला धमकी देत होता. मुलीला रुग्णालयात नेलं, त्यावेळी जबानीत तिने कासिमच नाव घेतलं.
धर्म परिवर्तनासाठी दबाव का?
आरोपी कासिमला अटक केल्यानंतर त्याच्याकडे बंदूक कुठून आली, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. कासिम मुलीवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता का? या अँगलने सुद्धा पोलीस तपास करणार आहेत. मुलगी सध्या रुग्णालयात असून पोलीस टीमने माहित जमवली आहे. तिच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्यानंतर तिच्याकडून विस्तृत माहिती घेतली जाईल.