नवी दिल्ली : मेट्रिमोनियल साईट्सवर (Matrimonial Site) प्रोफाईल बनवून मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण तरुणींशी ओळख करुन त्यांच्या फोटो आणि अश्लील व्हिडीओ (Womens Video) क्लीप तयार करायचा. तसेच नंतर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करण्याची धमकी देत तरुणींकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी त्याला अटक केले असून त्याने कित्येक तरुणींना फसवले असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव साहिल असून तो उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेक तसेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्याच्या मोबाईल फोनमध्ये तरुणींचे अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे एका तरुणीने तक्रार केली होती. या तरुणीने काही महिन्यांपूर्वी लग्नासाठी मेट्रोमोनियल साईटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये तरुणीची आरोपी साहिलोसोबत ओळख झाली. त्यांचं वेळोवेळी बोलणं होऊ लागलं. आरोपीने नंतर तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही दिवसांनी ते व्हिडीओ कॉलवरदेखील बोलत होते. याच काळात आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो देऊ लागला. धमकीचे हे सत्र इथपर्यंतच थांबले नाही, तर आरोपी तरुणीकडून पैशांची मागणी करत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने आरोपी साहिलविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर त्याचा भंडाफोड करण्यात आला.
पोलिसांनी दाखल तक्रारीनुसार तपास सुरु केला असता आरोपी साहिलने यापूर्वीदेखील अनेक तरुणींना फसवलं असल्याचं समोर आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी त्याच्या अकाऊंटमध्ये काही पैसे ट्रान्सफर केले. तसेच त्याच्या लोकेशननुसार पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी हालचाल सुरु केली. मात्र शंका आल्यामुळे तो सतत आपली जागा बदलत होता. पोलिसांनी त्याला अखेर साऊथ दिल्ली या भागातून अटक केलं. मागील अनेक दिवसांपासून साहिल नोकरीच्या शोधात होता, पुढे याच कळात त्याने दिल्ली, भोपाळ, गाझियाबाद येथील तरुणींना फसवलं, असं साहिलने सांगितलं आहे.
इतर बातम्या :
‘सुर्वे, ठोबरेंच्या नादी लागतो काय’ असं म्हणत मुळशी तालुक्यात उपसंरपंचावर हल्ला, गाडीचीही तोडफोड
Crime | पत्नीवर वाकडी नजर टाकायचा, रागाच्या भरात मित्राचा काढला काटा, भल्या पहाटे खळबळ