नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं भयानक हत्याकांड दिल्लीच्या शाहबाद डेरी एरीयामध्ये घडलं. आरोपीने भर रस्त्यात अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. तिच्यावर सपासप 20 वार केले. हे सर्व लोकांच्या नजरेसमोर घडलं, पण कोणी या मुलीच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. या प्रकरणातील आरोपीच नाव साहील खान आहे. मुलीची हत्या केल्यानंतर साहीलने काय केलं? त्याची माहिती समोर आलीय.
साहीलने मुलीची हत्या केल्यानंतर शाहबाद डेरी एरीया भागातील घटनास्थळावर तो अर्धातास फिरत होता. आरोपीने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हत्येनंतर साहील खानने काय केलं?
हत्या केल्यानंतर आरोपी साहील काहीवेळ जवळच्या पार्कमध्ये बसला होता. हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू त्याच्याकडे होता. पार्कमधून निघाल्यानंतर साहील रिथाला भागात गेला. तिथे त्याने तो चाकू जंगलात फेकून दिला व स्वत:चा मोबाइल फोन स्वीच ऑफ केला.
सतत आपल्या बस बदलल्या
त्यानंतर साहिल ई-रिक्क्षाने समयपूर बादली भागात गेला. तिथे त्याने मेट्रो स्टेशनजवळ रात्र काढली. दुसऱ्यादिवशी सकाळी तो समयपूर बादलीहून आनंद विहार येथे गेला. तिथून तो बसने बुलंदशहरला गेला. अटकेची भिती असल्याने साहील सतत आपल्या बस बदलत होता, असं पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेने ही माहिती दिलीय.
20 वेळा भोसकलं
या भयानक हत्याकांड प्रकरणातील आरोपी साहील खानला सोमवारी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून अटक करण्यात आली. त्याच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय. त्याने अल्पवयीन मुलीला जवळपास 20 वेळा भोसकलं.
साहिल खान काय काम करायचा?
साहिलने केलेली हत्या सुनियोजित असल्याचे संकेत मिळत आहेत. हे रागाच्या भरात केलेलं कृत्य नाही. हत्या करण्यासाठी साहिलने वापरलेला चाकू 15 दिवसांपूर्वी हरिद्वारहून आणला होता. देशाला हादरवून सोडणारे हे भयानक हत्याकांड कॅमेऱ्यात कैद झालय. साहिल पेशाने एसी मॅकेनिक होता.