जयपूर : डॉक्टरला देवाच रुप म्हटलं जातं. पण एका दाताच्या डॉक्टरने उपचाराच्या आडून सर्व मर्यादा ओलांडल्या. या डेंटल डॉक्टरकडे महिला दातांचे उपचार घेण्यासाठी गेली होती. या डॉक्टरने महिलेला बेशुद्धीच इंजेक्शन दिलं. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले. महिला दातांच्या रुट कॅनलसाठी या डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरने वेदनाशम इंजेक्शनच्या नावाखाली बेशुद्धीच इंजेक्शन दिलं. महिलेसोबत अश्लील चाळे केले. त्याचे फोटो काढले, व्हिडिओ बनवला व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
महिलेला ब्लॅकमेल करुन डॉक्टरने सलग एक वर्ष या महिलेवर वारंवार बलात्कार केला. हे प्रकरण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील भीनमाल शहरातील आहे. एका महिलेची दाढ दुखत होती. म्हणून ती उपचार घेण्यासाठी एका खासगी क्लिनिकमध्ये आली होती. दंत रोग तज्ज्ञाने वेदनाशम इंजेक्शनच्या नावाखाली तिला बेशुद्धीच इंजेक्शन दिलं. त्यानंतर त्याने महिलेचे अश्लील फोटो काढले, व्हिडिओ बनवले. आरोपी डॉक्टरने हे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एकावर्षात या डॉक्टरने सातवेळा महिलेवर बलात्कार केला.
फोनवरुन महिलेचा पती कधी घरी आहे ते विचारायचा
आरोपी फोनवरुन महिलेचा पती कधी घरी आहे, कधी घरी नाही, याची माहिती घ्यायचा. त्यानंतर महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने अनेकदा आरोपी डॉक्टरला फोटो, व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली. पण आरोपी अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. त्याने 6-7 वेळा महिलेवर बलात्कार केला.
क्लिनिकमध्ये कोणी नसताना चेकअपसाठी बोलवायचा
आरोपी डॉक्टर क्लिनिकमध्ये कोणी नसताना चेकअपसाठी बोलवायचा. रुट कॅनलसाठी वेळ लागणार, त्यामुळे कोणी नसताना बोलवतो, असं डॉक्टरकडून सांगितलं जायच असं महिलेने सांगितलं. महिलेच्या तक्रारीवरुन डॉक्टरविरोधात बलात्कार आणि आयटी कायद्याच्या विभिन्न कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक हिम्मत चारण यांनी दिली.