माहेरी जातेय सांगून पत्नी घरातून बाहेर पडली, मग पोलिसांनी तिला अशा अवस्थेत पकडलं की, नवऱ्याने थेट…

| Updated on: Dec 02, 2024 | 1:16 PM

नवरा-बायकोच नातं हे विश्वासाच असतं. पण अलीकडे नात्यातील हा विश्वास, सामंजस्य हरवत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी जातेय सांगून घरातून बाहेर पडली होती.

माहेरी जातेय सांगून पत्नी घरातून बाहेर पडली, मग पोलिसांनी तिला अशा अवस्थेत पकडलं की, नवऱ्याने थेट...
extramarital affair Representative Image
Image Credit source: Representative Image
Follow us on

पती-पत्नीच नातं साता जन्माच असतं. पण आजच्या काळात नात्याचं तसं मोल राहिलेलं नाही. तुमच्या नजरेत अनेक जोडपी असतील, जे विवाहीत असूनही आपल्या जोडीदाराला फसवतात. असच झारखंडच्या देवघरमधील एक प्रकरण समोर आलय. येथे एक विवाहित महिला पतीला फसवून प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर तीन दिवसांनी ती प्रियकरासोबत हॉटेलच्या रुममध्ये रोमान्स करताना सापडली.

नवऱ्याला हे समजल्यानंतर तो इतका संतापला की, 50 लोकांसह तो पोलीस स्टेशनमध्ये धडकला. तिथे त्याने गोंधळ घातला. पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. देवघरमधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी सुभाष चौक येथील हॉटेलमधून एका विवाहित महिलेला तिच्या प्रियकरासोबत पकडलं. पोलीस दोघांना स्टेशनमध्ये घेऊन आले. महिलेच्या पतीने तीन दिवसांपूर्वी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

सोबत गावातील 50 लोक आले

नवऱ्याला बायकोच सत्य समजल्यानंतर तो लगेच पोलीस स्टेशनमध्ये आला. सोबत गावातील 50 लोक आले. पतीच म्हणण होतं की, आता त्याला पत्नीसोबत रहायच नाही. त्याला घटस्फोट हवा होता. पोलिसांनी बऱ्याच मेहनतीने हा गोंधळ थांबवला. पत्नी सुद्धा ती प्रियकरासोबतच रहाणार म्हणून अडून बसलेली.

‘मला थोडा संशय आला’

त्यांचं लग्न सहा महिन्यापूर्वी झालं होतं. लग्नानंतर दोन महिने सगळं काही व्यवस्थित होतं. “पण मला हे माहित नव्हतं की, पत्नीचा बॉयफ्रेंड आहे. दोन महिन्यानंतर ती सतत माहेरी जावू लागली. मला थोडा संशय आला, पण हे समजत नव्हतं की, दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी ती माहेरी का जाते?. 28 नोव्हेंबरला ती पुन्हा माहेरी जायचं आहे सांगून घरातून बाहेर पडली” असं नवऱ्याने सांगितलं.

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार

“मी तिच्या माहेरी फोन करुन विचारलं. ते म्हणाले की, ती माहेरी आलेली नाही. पण दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. 1 नोव्हेंबरला पोलिसांनी पत्नीला हॉटेलमध्ये परपुरुषासोबत पकडलं. तो माझ्या पत्नीचा बॉयफ्रेंड होता. तो तिच्या गावचा मुलगा होता. पत्नीला तो इतका आवडता होता, तर मला असा फसवायचा हक्क नाही. मला पत्नीने फसवलय. मी तिच्यासोबत राहणार नाही” असं नवरा म्हणाला.

नवऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराची चौकशी सुरु आहे. पत्नीला सुद्धा तिच्या प्रियकरासोबत रहायचय. दोन्ही बाजूंची चौकशी सुरु आहे.