घटस्फोटीत महिला मांत्रिकाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत राहिली, अखेर एक दिवस….

| Updated on: Oct 16, 2024 | 3:23 PM

एका घटस्फोटीच महिलेला मांत्रिकाच्या नादाला लागणं खूपच महाग पडलय. या महिलेची मांत्रिकाच्या नादाला लागून मोठी फसवणूक झाली आहे. या महिलेने मांत्रिकावर विश्वास ठेवला तो जे सांगेल ते ऐकत राहिली. अखेर एकदिवस या महिलेला सत्य समजलं.

घटस्फोटीत महिला मांत्रिकाच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत राहिली, अखेर एक दिवस....
women cheat by tantrik baba
Image Credit source: AI Image
Follow us on

एका महिलेने मांत्रिकाच्या नादाला लागून आपलं मोठ नुकसान करुन घेतलं. मांत्रिकामुळे या महिलेची मोठी फसवणूक झाली. मांत्रिकाने महिलेला आमिष दाखवलं होतं. मांत्रिकाने महिलेला तिचा मुलगा मिळवून देण्याचा शब्द दिला होता. या महिलेचा घटस्फोट झाला आहे. तिचा मुलगा पित्यासोबत राहत आहे. मुलाने आपल्यासोबत रहावं अशी महिलेची इच्छा होती. तुझा मुलगा तुझ्याकडे परत येईल असा मांत्रिकाने या महिलेला आश्वासन दिलं होतं. महिलेने यासाठी कायदेशीर मदत घेण्याऐवजी तांत्रिकाचा आधार घेतला. उत्तराखंडच्या डेहराडूनमधील हे प्रकरण आहे.

मुलगा परत मिळवून देतो सांगितलं, तिथूनच फसवणुकीचा सर्व खेळ सुरु झाला. महिलेला सोशल मीडियावर मांत्रिकाचा नंबर मिळालेला. महिलेने तांत्रिकाशी संपर्क साधलेला. तांत्रिकाने महिलेच सगळ म्हणण ऐकून घेतलं. मी तुझी समस्या सोडवू शकतो, पण त्याआधी तुला 5500 रुपये जमा करावे लागतील असं तिला सांगितलं. महिलेने जे सांगितलं ते केलं. त्यानंतर मांत्रिकाने महिलेला असं फसवलं की, तिच्याकडून 6 लाख 8 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांची मदत घेतली.

स्वातीला बाबाबद्दल कुठे समजलं?

मांत्रिकाने आणि त्याच्या टीमने दागिने विकून पैशाची व्यवस्था करण्यासाठी भाग पाडलं असा महिलेने आरोप केला. महिलेने पटेलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून चौकशी सुरु केली आहे. 37 वर्षी स्वाती अग्रवाल यांनी एफआयआर नोंदवला आहे. स्वातीने नवऱ्यापासून घटस्फोट घेतलाय. मुलगा नवऱ्यासोबत राहतो. महिलेच तिच्या मुलावर भरपूर प्रेम आहे. तिला काहीही करुन मुलगा सोबत हवा आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर तिने राधेश्याम बाबांच पेज पाहिलं. तिने अनेक उपाय सांगितले होते.

पोलीस या बाबाच्या मागावर

स्वातीला वाटलं कदाचित बाबा तिची मदत करतील. ऑनलाइन संपर्क साधताना तिने राधेश्याम बाबासोबत फोनवर बोलली. आधी तिने 5500 रुपये जमा केले. त्यानंतर वेगवेगळ्यावेळी तिच्याकडून 6.08 लाख रुपये उकळले. पोलीस या बाबाच्या मागावर असून लवकरच त्याला अटक होऊ शकते.