तुमची मुलं जर सोसायटीत खेळत असतील, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि वेळी सावध होऊन योग्य ती काळजी घ्या. कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर लहानगेच काय मोठी माणसेही घाबरतील असा व्हिडिओ आहे.
Ad
सोसाटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला कुत्र्याचा चावा
Image Credit source: tv9
Follow us on
मुंबई : मुंबईत आणि उपनगरांमध्ये अशा अनेक रहिवाशी सोसायट्या (Housing Society) आहेत. ज्या ठिकाणी मुलं (Child) बिन्धास्त खेळत असतात. बागडत असतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे किती अंगलट येऊ शकतं हे दाखवणारीच एक घटना आज मुंबईतील मीरा रोड परिसरात घडली आहे. मीरा रोड परिसरात एक चिमुकला आपल्या मित्रांसह सोसायटीच्या आवारात खेळत होता. मात्र त्याचवेळी एका भटक्या कुत्र्याने त्याला चावा (Dog Bite) घेतल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोडमध्ये घडला आहे. त्यामुळे तुमची मुलं जर सोसायटीत खेळत असतील, तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि वेळी सावध होऊन योग्य ती काळजी घ्या. कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर लहानगेच काय मोठी माणसेही घाबरतील असा व्हिडिओ आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारातील भटकी कुत्री ही पुन्हा एकाद मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
कुत्रा चावा घेतानाचा व्हिडिओ
मुंईतील मीरा रोडच्या पूनम सागर परिसरात सात वर्षांच्या मुलाला कुत्र्याचा चावा…घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद… pic.twitter.com/Wtqt5qTGVH
मीरा रोडच्या पूनम सागर परिसरात सात वर्षांच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतला आहे. कुत्र्याचा चावल्याची घटना वरच्या सीसीटीव्हीत तुम्ही पाहिलीच असेल. हा व्हिडिओ मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समधील आहे. या संकल्प सोसायटी परिसरात खेळत असताना सात वर्षीय अर्जुन गुप्ता नावाच्या मुलासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास लक्षात येते की सोसायटीच्या आवारात काही मुलं खेळताना, ईकडे तिकडे पळताना दिसून येत आहे.
अंगावर पाय पडताच कुत्र्याचा हल्ला
हा लहानगाही सोसायटी परिसरात खेळत होता तेव्हा त्याचा पाय धावता धावता कुत्र्यावर पडला तेव्हा तिथेच बसलेला कुत्रा खवळला आणि त्याने या लहानग्यावर हल्ला केला. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भडक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होताना दिसत आहे. अशा घटना थांबवण्यासाठी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या प्रकराणे सोसायटीच्या आवारत खेळणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.