DRI चे मुंबईत वर्सोवा, झवेरी बाजार येथे छापे, 24 किलो सोनं जप्त

| Updated on: Mar 07, 2024 | 2:56 PM

DRI ने कारवाई केली आहे. चोरीच्या मार्गाने सोनं तस्करी करुन भारतात आणल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर डीआरआयने कारवाई केली.

DRI चे मुंबईत वर्सोवा, झवेरी बाजार येथे छापे, 24 किलो सोनं जप्त
Gold Seized
Follow us on

मुंबई : डीआरआयने मुंबईत वर्सोवा आणि झवेरी बाजार येथे छापे मारले. तस्करी करण्यासाठी परदेशातून भारतात आणलेलं 14 किलो सोनं जप्त केलं. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. डीआरआयने झवेरी बाजार, मुंबादेवी आणि वर्सोवा परिसरात छापेमारीची कारवाई केली.

चोरीच्या मार्गाने सोनं तस्करी करुन भारतात विकलं जात असल्याची माहिती होती. याची माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. अटक करण्यात आलेला आरोपी समीर मर्चंट याला आधीही परदेशी चलन भारतात आणल्याप्रकरणी एकदा झाली होती अटक.

डीआरआयने किती किलो सोन जप्त केलं?

आधीचे नाव अफझल बटाटावाला असून आरोपी समीर मर्चंट आणि त्याची पत्नी मिळून हे सिंडिकेट चालवत होते.डीआरआयने 24 किलो सोनं आणि दोन कोटी रोख रक्कम तसेच 4600 पौंडसुधा जप्त केले.

प्रतिकिलो कमिशन किती होतं?

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीला दोन ते तीन हजार रुपये प्रतिकिलो कमिशन मिळायचं. या गुन्ह्यात एक महिला सहभागी होती. दुबईतील मुख्य आरोपीची माहिती सुद्धा डीआरआयला मिळाली. भारतात सोन आणून त्याची कमी दरात विक्री करायचे. डीआरआयला याची माहिती मिळाली होती. त्यांनी सापळा रचून कारवाई केली.

महेंद्र जैन, मोहम्मद रफीक रझवी व समीर मर्चंट ऊर्फ अफजल हारून बटाटावाला, उमेद सिंह, महिपाल व्यास अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.