मुंबई: रस्ते अपघातप्रकरणी दादरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पादचाऱ्याच्या चुकीमुळे जर अपघात झाला. तर वाहनचालकाला दोषी धरता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. (Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)
मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश पी. देशमाने यांनी हा निर्णय दिला आहे. रस्त्यावरून चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावध राहणं हे पादचाऱ्याचं कर्तव्य आहे. पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर अपघात होत असेल तर ड्रायव्हरला दोषी धरता येणार नाही, असं देशमाने यांनी स्पष्ट केलं. तसेच 5 वर्षापूर्वी झालेल्या अपघात प्रकरणातून एका 65 वर्षी महिलेला कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे.
20 ऑक्टोबर 2015 रोजीचं हे प्रकरण आहे. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता एक महिला पायी ऑफिसला जात होती. दादरच्या पारसी अग्यारी पर्यंत ही महिला आली असेल तेव्हा एका कारने तिला धडक दिली. त्यामुळे ही महिला जमिनीवर कोसळली असता तिच्या पायाच्या अंगठ्यावरून कारचं चाक गेलं. एक उद्योजिका ही कार चालवत होती. दुर्घटना झाल्यानंतर या महिलेने कार थांबवलीही होती.
दुसऱ्या दिवशी जखमी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर काही आठवड्यानंतर या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आणि खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आरोपपत्रं दाखल केलं होतं. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आज हा महत्त्वाचा निर्णय दिला.
पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ बनविण्यात आले आहेत. तसेच वाहनांसाठी रस्ते बनविण्यात आला आहेत. परंतु, जखमी महिला रस्त्यावरून जात होती. त्यामुळे गाडी चालवणाऱ्या महिलेला दोषी धरता येणार नाही, असं कोर्टाने निकालात म्हटलं आहे. (Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)
संबंधित बातम्या:
वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!
पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका, सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या
बहिणीसोबत भांडताना ओरडल्याचा राग, पुण्यात 13 वर्षांच्या मुलाने कांदा चिरताना वडिलांना भोसकलं
(Driver can’t be held liable for pedestrian’s negligence, says dadar court)