महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राज्यात सर्वत्र महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरु आहेत. राज्याचा राजकीय पार वाढला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खरतर महाराष्ट्रात प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. येत्या 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ED कडून छापेमारी करण्यात आली आहे.
ED कडून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण 23 ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असू शकतो. नॅशनल मर्कटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी आहे. 100 कोटीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाच हे प्रकरण आहे. नाशिकमधून अटक केलेल्या सिराज अहमदशी संबंधित ही छापेमारी आहे. व्होट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
दोन दिवसांत धमाका होणार असल्याच वक्तव्य
125 कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी ED ची टीम मालेगावात दाखल झाली आहे. प्रमुख आरोपी असलेल्या सिराज अहमदच्या घरी ED कडून तपासणी सुरू आहे. नामको बँकेची देखील ED चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार. व्होट जिहादसाठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलं होतं. काल किरीट सोमय्या यांनी येत्या दोन दिवसांत धमाका होणार असे वक्तव्य केले होते.