Gujrat Riot : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टला अटक, कोठडी मृत्यू प्रकरणानंतर आता गुजरात दंगलीमुळे अडचणीत वाढ

| Updated on: Jul 13, 2022 | 5:11 PM

पालनपूर कारागृहात बंद असलेल्या संजीव भट्टच्या अटकेची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेचे पथक त्याच्यासोबत अहमदाबादला पोहोचले. संजीव भट्ट हे अनेक दिवसांपासून पालनपूर कारागृहात आहेत.

Gujrat Riot : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्टला अटक, कोठडी मृत्यू प्रकरणानंतर आता गुजरात दंगलीमुळे अडचणीत वाढ
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
Follow us on

अमहदाबाद : कोठडी मृत्यू प्रकरणी पालनपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (Sanjeev Bhatt) यांना गुजरात दंगल (Gujrat Riot) प्रकरणी अहमदाबाद क्राईम ब्रांचने अटक (Arrest) केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात दंगलीप्रकरणी एफआयआर नोंदवून अहमदाबाद गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि माजी अधिकारी आरबी श्रीकुमार यांच्यानंतर आता संजीव भट्टला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने गुजरात दंगल प्रकरणी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनाही अटक केली आहे. अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या पथकाने पालनपूर कारागृहात प्रदीर्घ काळ बंद असलेल्या संजीव भट्टला मंगळवारी अटक केली.

संजीव भट्टच्या अडचणीत वाढ

पालनपूर कारागृहात बंद असलेल्या संजीव भट्टच्या अटकेची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेचे पथक त्याच्यासोबत अहमदाबादला पोहोचले. संजीव भट्ट हे अनेक दिवसांपासून पालनपूर कारागृहात आहेत. संजीव भट्ट यांना कोठडी मृत्यू प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. कोठडी मृत्यूप्रकरणी दोषी ठरलेल्या संजीव भट्टच्या अडचणीत आता गुजरात दंगलीमुळे आणखी वाढ झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल

विशेष म्हणजे अहमदाबाद क्राइम ब्रँचने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुप्रीम कोर्टाने या तिघांबद्दल कडक टिप्पणी केली होती आणि त्यांच्याबद्दल अधिक चौकशीची गरज असल्याचेही म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.

हे सुद्धा वाचा

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या क्लीन चिटच्या एसआयटी अहवालाला आव्हान देणाऱ्या झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना तिस्ता सेटलवाड आपला स्वार्थ सिद्ध करण्यात व्यस्त असल्याचे म्हटले आहे. संजीव भट्ट आणि आरबी श्रीकुमार यांनी दाखल केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्राचाही न्यायालयाने संदर्भ दिला होता. (Ex Ips officer Sanjeev Bhatt arrest by ahmedabad crime branch in gujrat riot case)