100 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड, घरुनच चालवत होता बनावट व्हिसाची फॅक्टरी…पोलिसांच्या सापळ्यात असा आला मनोज मोंगा

| Updated on: Sep 20, 2024 | 12:32 PM

Fake visa factory: जास्त कमाईच्या लालचेमुळे तो गुन्हेगारीच्या जगात आला. पोलिसांनी आतापर्यंत 150 पेक्षा जास्त एजंटला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची कमाई झाली आहे. पोलीस आता बनवाट व्हिसा बनवणारी संपूर्ण टोळी उद्धवस्थ करण्याच्या तयारीत आहे.

100 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड, घरुनच चालवत होता बनावट व्हिसाची फॅक्टरी...पोलिसांच्या सापळ्यात असा आला मनोज मोंगा
दिल्लीत बनावट व्हिसा घोटाळा उघड झाला.
Follow us on

नवी दिल्ली पोलिसांनी नुकताच एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी मनोज मोंगा नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर 100 कोटींच्या बनावट व्हिसा देण्याचा आरोप आहे. बॅनर बनवण्याचे काम करणारा मनोज मोंगा त्या माध्यमातून मोठा घोटाळा करत होता. पोलीस मोंगाच्या घरी पोहचल्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. त्यात शेकडो प्रकारचे सील, कागदपत्रे आणि स्टेशनरी सापडली आहे. मनोज मोंगा हा फोटोशॉप आणि कोरेल सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळ्या देशांच्या व्हिसाच्या हुबेहूब प्रती तयार करत होता. मनोज मोंगा ग्राहकाची गरज पाहून व्हिसासाठी पैसे घेत होता. महिन्याला 20-30 बनावट व्हिसा बनवत होता.

मनोज मोंगाची पार्श्वभूमी सर्वसामान्यासारखी

मनोज मोंगा सर्वसामान्यांप्रमाणे राहत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस पोहचल्यावर परिसरातील लोकांनाही धक्का बसला. मनोज मोंगा याची पत्नी शिक्षिका आहे. त्याला दोन मुले असून एक मुलगा दिल्लीतील कॉलेजमध्ये आहे. दुसरी मुलगी शिक्षणासाठी जर्मनीत गेला आहे. मुलीच्या शिक्षणासाठी मनोज मोंगाने कर्जही घेतले आहे.

एकच फोन वापरत होता…

मनोज मोंगा याची काम करण्याची पद्धत वेगळी होती. तो फक्त एक फोन वापरत होता. तो फोनही एजंटसोबत संपर्क करण्यासाठी काही वेळ सुरु करत होता. त्यामुळे पोलिसांनी मनोजला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यासाठी एका एजंटला सोबत घेतले. त्यानंतर नकली व्हिसा बनवण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले. त्यानंतर मनोज मोंगा पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली.

हे सुद्धा वाचा

एका व्हिसासाठी एक लाख रुपये

मनोज मोंगा बॅनरच्या व्यवसायात होता. एका बॅनरसाठी त्याला पाच हजार मिळतो. त्यावेळी नकली व्हिसा बनवणाऱ्या एजंटने त्याच्याशी संपर्क साधला. एका व्हिसासाठी एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. जास्त कमाईच्या लालचेमुळे तो गुन्हेगारीच्या जगात आला. पोलिसांनी आतापर्यंत 150 पेक्षा जास्त एजंटला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची कमाई झाली आहे. पोलीस आता बनवाट व्हिसा बनवणारी संपूर्ण टोळी उद्धवस्थ करण्याच्या तयारीत आहे.