आधी अपहरण, मग विजेचे झटके; अभिनेता आणि अभिनेत्रीने का केली आपल्याच चाहत्याची हत्या

| Updated on: Jun 22, 2024 | 7:34 PM

Actor Darshan and Pavithra Gowda : रेणुका स्वामी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. कुत्र्यांनी चावा घेतला.

आधी अपहरण, मग विजेचे झटके; अभिनेता आणि अभिनेत्रीने का केली आपल्याच चाहत्याची हत्या
Follow us on

कन्नड चित्रपट अभिनेता दर्शनला रेणुकास्वामी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगळुरू न्यायालयाने अभिनेत्याला ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 22 जून रोजी पोलिसांनी त्याला आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले होते. रेणुकास्वामी हत्याकांडप्रकरणी त्याच्या चार कथित साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा अभिनेता 11 जूनपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. विशेष सरकारी वकिलांनी आरोपींना कर्नाटकातील वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्याला दर्शनच्या वकिलांनी विरोध केला.

दर्शन आणि त्याच्या साथीदारांना बंगळुरू येथील परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने दर्शनचे चाहते जमले होते. दर्शनच्या समर्थनात चाहत्यांनी घोषणाबाजी केली. अभिनेत्याचा मित्र पवित्र गौडा याच्यासह अन्य १३ आरोपींना दोन दिवसांपूर्वी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या खून प्रकरणात 17 जण आरोपी आहेत.

अभिनेत्याने का केली चाहत्याची हत्या

रेणुकास्वामी याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. विजेचे झटके देण्यात आले. त्याच्या प्रायव्हेट पार्टवरही हल्ला केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचा एक कानही गायब होता. एवढेच नाही तर कुत्र्यांनी त्याचा चेहरा ओरबाडून खाल्ला होता.

रेणुका स्वामी हत्या प्रकरणाने कन्नड चित्रपटसृष्टीला हादरवून सोडले आहे. अभिनेता दर्शन थुगुडेपा आणि त्याची मैत्रीण अभिनेत्री पवित्रा गौड यांना ३३ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. रेणुका स्वामी हा दर्शनाचा चाहता होता.

रेणुकास्वामी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीप याने कबुली दिली आहे की त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याचे नाव कुठेही समोर येऊ नये म्हणून अन्य आरोपींना 30 लाख रुपये दिले होते. पोलिसांनी आरोपीच्या घरातूनही ही रक्कम जप्त केली आहे. पोलिसांना रेणुका स्वामी यांचा मृतदेह 9 जून रोजी बेंगळुरूमधील एका नाल्यात सापडला होता.

३३ वर्षीय रेणुका स्वामीवर दर्शन थुगुडेपा, पवित्रा गौडा आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. रेणुका स्वामी यांचे आधी अपहरण करून नंतर दोरीने बांधून निर्जनस्थळी ठेवण्यात आले. त्याला काठ्यांनी जबर मारहाण करून विजेचे झटके देण्यात आले. शवविच्छेदन अहवालात “शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

पवित्रा गौर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अशोभनीय टिप्पणी केल्याने दर्शनाला त्याचा राग आला. त्यानंतर दोन्ही कलाकारांनी रेणुका स्वामीच्या हत्येचा कट रचलाय असे या प्रकरणातील अटक आरोपींनी उघड केले आहे. दर्शनाच्या सांगण्यावरून 8 जून रोजी त्याचे अपहरण केले आणि त्याला बंगळुरू येथील एका शेडमध्ये नेले, जिथे त्यांनी कथितपणे अत्याचार करून त्याची हत्या केली.