ATS Action : पीएफआयच्या (PFI) आणखी एकाला एटीएसने (ATS) जळगाव (Jalgaon) येथून ताब्यात घेतलेले आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया आणि कट कारस्थानाच्या आरोपांखाली पीएफआय संघटनेला रडारवर घेतले आहे. त्यातील ज्या संशयितांना एटीएसने अटक केली आहे त्यांच्या मोबाइल फॉरमॅट करणाऱ्या एकाला जळगावमधून ताब्यात घेतले आहे. नुकतेच त्याला नाशिकच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, त्यात त्याला 14 दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे. उनैस उमर खय्याम पटेल असे त्याचे नाव असून त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी मोठी जबाबदारी हाती घेलत्याचे समोर येत आहे. संशयित पटेल याचे काही आक्षेपार्ह संवादाचे ऑडिओ क्लिपही एटीएसच्या हाती लागल्या आहेत. त्यानुसार त्याचीही सखोल चौकशी एटीएसकडून करण्यात येणार आहे. एटीएसने गेल्या महिन्यात मालेगावातील एकासह पाच संशयितांना अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली जेरबंद केलेल्या संशयितांचा डेटा फॉरमॅट करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या संशयितांच्या मोबाईल, लॅपटॉपमधील संवेदनशिल डेटा फॉरमॅट केल्याची बाब उघड झाली आहे.
नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएससने उनैस उमर खय्याम पटेल याला जळगावमधून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत १४ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली आहे.
याशिवाय पटेल यांच्या आक्षेपार्ह संवादाच्या ऑडिओ क्लिपही एटीएसच्या हाती लागल्या असून त्याचीही सखोल सुरू करण्यात आली आहे.
नाशिक एटीएसने जेरबंद केलेल्या पाच जणांचा तपास करत असतांना त्यांचे मोबाइल आणि लॅपटॉप आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले होते. त्यातील संवेदनशील डेटा फॉरमॅट केल्याचे सामोर आले आहे.