तिचा मृतदेह कधीच सापडला नसता, जर तिच्या पाठीवर… 11 दिवसानंतर मोठं यश

| Updated on: Jan 13, 2024 | 7:29 PM

दिव्याचा मारेकरी बलराज गिल याला गुरुवारी कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली होती. पंजाबच्या पटियाला बस स्टँड जवळ कार सोडल्यानंतर तो गायब झाला होता. त्याची कसून चौकशी केल्यानंतर मॉडेल दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं कळलं होतं. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मृतदेह कुठे फेकला होता याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी रवि बंगा अजून फरार आहे.

तिचा मृतदेह कधीच सापडला नसता, जर तिच्या पाठीवर... 11 दिवसानंतर मोठं यश
model Divya Pahuja
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदीगड | 13 जानेवारी 2023 : प्रसिद्ध मॉडल दिव्या पाहुजा हिच्या हत्याकांडाची केस सोडवण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. 2 जानेवारी रोजी दिव्याची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून ती गायब होती. अखेर 11 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तब्बल अकरा दिवस रात्र न् दिवस सर्च ऑपरेशन केलं. त्यानंतर अखेर दिव्याचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे हा मृतदेह ओळखणं कठिण होतं. फक्त एका गोष्टीमुळे हा मृतदेह ओळखता आला आणि दिव्याची ओळख पटली.

हरियाणाच्या फतेहाबादच्या टोहनामधील भाखडा कालव्यात दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला आहे. तब्बल अकरा दिवस हा मृतदेह पाण्यात राहिल्याने तो छिन्नविछिन्न झाला आहे. बॉडी पूर्ण फुगली आहे. बॉडीच्या डोक्याचे केसही पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे ही बॉडी कुणाची हे ओळखणंही कठीण झालं होतं. पोलिसांनी दिव्याच्या आईला घटनास्थळी बोलावलं.

तिच्या आईलाही लेकीला ओळखता येत नव्हतं. अखेर मुलीच्या पाठ आणि हातावरील टॅटूवरून हा मृतदेह दिव्याचाच असल्याची ओळख पटली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हिसारच्या अग्रोहा मेडिकल कॉलेजात मृतदेह पाठवण्यात आला आहे. जर दिव्याच्या पाठीवर आणि हातावर हे टॅटू नसते तर तिची ओळख कधीच पटली नसती. दिव्याचं काय झालं? हे कधीच जगासमोर आलं नसतं.

अन् गुरुग्राम पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं

या धक्कादायक हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती. मुख्य आरोपी हॉटेल व्यावसायिक अभिजीत सिंग याचे गुंड बलराज गिल याला अटक करण्यात आली. त्यावेळी बलराजने पटियालाच्या जवळ एका कालव्यात दिव्याचा मृतदेह फेकल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मात्र, अनेक दिवस मृतदेह सापडला नाही. शनिवारी पोलिसांच्या पथकाने फतेहाबादच्या टोहना भाखडा कालव्यात शोध घेतला. यावेळी दिव्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह प्रचंड खराब झाला होता. मृतदेह ओळखणंही कठीण झालं होतं. मात्र, दिव्याच्या आईने लेकीची ओळख पटवल्याने पोलिसांनी सुटकेचा नि: श्वास सोडला. आता पोस्टमार्टेममधून बऱ्याच गोष्टी उघड होणार आहे.

दोन राज्यातील पोलीस कामाला

मिळालेल्या माहितीनुसार दिव्याचा मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफचीही टीम आली होती. या टीममध्ये एकूण 25 सदस्य होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांनी एकत्र काम केलं. दोन्ही राज्याच्या पोलिसांनी खनौरी बॉर्डरपर्यंतच्या कालव्यात जाऊन शोध घेतला.