बायकोचा खून करुन विमानातून ढकललं, 1985 मधील हत्याकांडाची तीन दशकांनी कबुली

| Updated on: Oct 22, 2021 | 4:12 PM

परिस्थितीजन्य पुराव्यामुळे अनुभवी पायलट रॉबर्ट बेरेनबॉमला दोषी ठरवण्यात आले. डिसेंबर 2020 च्या पॅरोल बोर्डाच्या सुनावणीदरम्यान थंड डोक्याने कबुलीजबाब देताना रॉबर्टची जन्मठेपेची 20 वर्षांची शिक्षा भोगून झाली होती

बायकोचा खून करुन विमानातून ढकललं, 1985 मधील हत्याकांडाची तीन दशकांनी कबुली
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी 2000 मध्ये दोषी ठरलेला प्लास्टिक सर्जन रॉबर्ट बेरेनबॉमने (Robert Bierenbaum) हत्येनंतर पत्नीचा मृतदेह विमानातून खाली फेकून दिल्याची कबुली दिली. जवळपास तीन दशकं निर्दोष असल्याचा आव आणल्यानंतर बेरेनबॉमच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश झाला.

1985 मध्ये पत्नीची हत्या

परिस्थितीजन्य पुराव्यामुळे अनुभवी पायलट रॉबर्ट बेरेनबॉमला दोषी ठरवण्यात आले. डिसेंबर 2020 च्या पॅरोल बोर्डाच्या सुनावणीदरम्यान थंड डोक्याने कबुलीजबाब देताना रॉबर्टची जन्मठेपेची 20 वर्षांची शिक्षा भोगून झाली होती. 1985 मध्ये रॉबर्टची पत्नी गेल काट्झ (Gail Katz) बेपत्ता झाल्यानंतर त्याने पहिल्यांदाच आपला गुन्हा कबूल केला होता. विमानातून खोल समुद्रात पडल्यानंतर गेल काट्झचा मृतदेह कधीच सापडला नाही.

हत्येचं कारण धक्कादायक

एबीसी न्यूजने सुनावणीबाबत दिलेल्या वृत्तानुसार, “तिने माझ्यावर ओरडणे थांबवावे, अशी माझी इच्छा होती. याच उद्देशाने मी तिच्यावर हल्ला केला.” अशी कबुली रॉबर्ट बेरेनबॉम याने दिली. “मी तिचा गळा दाबला. त्यानंतरही मी विमान चालवत राहिलो. काही वेळाने समुद्राच्या वरुन जाताना मी विमानाचा दरवाजा उघडला आणि तिचा मृतदेह बाहेर टाकला” मी बायकोची हत्या केली कारण त्यावेळी मी “अपरिपक्व” होतो आणि “रागावर नियंत्रण कसं ठेवावं, हे मला समजत नव्हतं” असं लंगडं समर्थन त्याने केलं.

बेरेनबॉमच्या कबुलीने प्रत्येकालाच धक्का बसला, कारण त्याच्या 2000 च्या खून खटल्यात न्यायालयात वकिलांनी नेमका हाच सिद्धांत मांडला होता. बेरेनबॉम तुरुंगात असून या प्रकरणावरील पुढील पॅरोल सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

दारु पिण्यावरुन हॉटेल मालकाशी वाद, दुसऱ्या दिवशी येऊन हल्ला, कर्मचाऱ्याला दोघांनी खंजीर भोसकला