लखनौ : उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या आत्मराम तोमर (Atmaram Tomar) यांची हत्या करण्यात आली आहे. देशासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेते आणि माजी मंत्री आत्मराम तोमर यांची टॉवेलने गळा दाबून हत्या झालीय. तोमर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
बडौतच्या बिजरौल रोड येथे आत्माराम तोमर यांचं निवासस्थान आहे. टॉवेलचा वापर करुन आत्माराम तोमर यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांची कार देखील गायब झाली आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय आज सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नव्हती.
दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. त्यानंतर ड्रायव्हरनं तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.
दुसरीकडे, मृत डॉ.आत्माराम तोमर यांचा मुलगा डॉ. प्रतापही घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या, मृत्यू किंवा हत्येचे कोणतंही कारण समोर आलं नाहीय. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांमध्येही खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे, लवकरच कारण समोर येईल, असं पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
आत्माराम तोमर भाजपचे नेते आणि माजी मंत्री राहिलेले आहेत.
1997 साली भाजपानं त्यांना मंत्रिपद दिली होती.
तोमर यांनी 1993 साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
आत्माराम तोमर जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत.
(Former Uttar pradesh Minister Atmaram tomar murder)
हे ही वाचा :