बीड : वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून अर्धवट जळालेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर या घटनेतील चार संशयित आरोपी फरार आहेत. (four accused tried to set youth on fire on his birthday in beed district)
मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा गायकवाड या तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे चार तरुण आले आणि त्याला धारुर घाटात घेऊन गेले. मात्र, वाढदिवस साजरा न करता गायकवाड या तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला वाढदिवशीच जिवंत जाळण्यात आले. यामध्ये कृष्णा गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
हा प्रकार समोर येताच चार जणांविरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून तपासाला सुरुवात केली आहे. संशयित चार आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे जखमी झालेल्या तरुणावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.
दरम्यान, वाढदिवशीच एक तरुणाला जिंवत जाळून त्याची हत्या करण्याचे धक्कादयक कृत्य केल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणांनी हे कृत्य नेमके का केले ? या कृत्यामागे सुडाची भावना होती का ? असे प्रश्न विचारले जात आहे. फरार संशयित आरोपींनी हा प्रकार का केला याचा अद्याप सोध लागला नसून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.
इतर बातम्या :
हा तर बापाच्या नावाला कलंक!! पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, गर्भपात करून जबरदस्तीने लावले लग्न
पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना
सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हाच आमचा एककलमी कार्यक्रम; प्रविण दरेकरांचा राष्ट्रवादीला इशारा#PravinDarekar #MumbaiBank #मुंबैबँकhttps://t.co/lBim4qyLAS
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 23, 2021
(four accused tried to set youth on fire on his birthday in beed district)