Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक

| Updated on: Dec 14, 2021 | 6:42 PM

एका मॅट्रीमनी साइट(Matrimonial Site)वर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेनं तरुणाला फसवलं (Cheated) आहे. भाईंदर(Mira Bhayandar)च्या नवघर पोलीस (Navghar Police)ठाण्यात यासंबंधी एफआयआर (FIR)दाखल झालाय.

Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक
नवरीमुलीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद!
Follow us on

मीरा भाईंदर : आपल्याला आयुष्याचा साथीदार मिळाला, असा विचार करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाला महिलेची ओळख महागात पडलीय. एका मॅट्रीमनी साइट(Matrimonial Site)वर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेनं तरुणाला फसवलं (Cheated) आहे. भाईंदर(Mira Bhayandar)च्या नवघर पोलीस (Navghar Police)ठाण्यात यासंबंधी एफआयआर (FIR)दाखल झालाय.

58, 500 रु. ट्रान्सफर
अधिक माहितीनुसार, संबंधित तरुण एका नामांकित टेलिकम्युनिकेशन कंपनीत सेल्स मॅनेजर (Sales Manager) म्हणून काम करतो. प्रथम महिलेनं तरुणाशी ओळख वाढवली. या महिलेनं स्वतःची ओळख बिहारची मूळ रहिवासी अशी करून दिली. ती तिच्या कुटुंबासह तिची आई आणि दोन लहान भावंडं उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद इथं स्थायिक झाली होती. तक्रारदाराचा विश्वास जिंकल्यानंतर महिलेनं रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत तसेच नवीन मोबाइल फोन घेण्यासाठी मागणी सुरू केली. तक्रारदार या असल्या भावनिक गोष्टींना प्रभावित झाला. याचा गैरफायदा घेत संबंधित महिनेनं पंधरा दिवसांच्या कालावधीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)द्वारे विविध बँक खात्यांमध्ये सुमारे 58, 500 ट्रान्सफर करून घेतले.

चुकीचं घडत असल्याची जाणीव
सुमारे सात दिवसांच्या अंतरानंतर, महिलेनं तक्रारदाराला मेसेज पाठवला आणि तिच्या आईच्या निधनाबद्दल माहिती दिली. यासाठीदेखील तिनं पैशांची गरज असल्याचं सांगितलं. काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव तक्रारदाराला झाली, त्यामुळे त्याने महिलेला पत्ता विचारला. मात्र, महिलेनं त्याला भेटण्यास नकार दिला.

विविध कलमांतर्गत गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं व्यवहार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पलीस करत आहेत.

Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या

Pune Crime | कुख्यात गुंड रूपेश मारणे याच्यावर ‘एमपीडीए’ची कारवाई ; गजानन मारणेची तळोजा ते पुण्यापर्यंत काढली होती रॅली

पतीची शारीरिक संंबंधांसाठी बळजबरी, पत्नीने प्रायव्हेट पार्टच कापला