पुणे – शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी र्षल रमेश नावगेकर (वय 42, ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने चेतन पाटील, महेश बालकिशन राठी यांना अटक केली आहे. अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे,हे दोघे अद्याप फरार आहेत.
अशी केली फसवणूक
या घटनेतील चारही आरोपी कोलते पाटील डेव्हलपर्स येथे कामाला आहेत. यांनी कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या वेंडर कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहारांचा दुरुपयोग केला. आरोपीनी साधारण 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बनावट व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्या करता वापरले.
कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या ‘स्टील पॉईंट’च्या नावाने खोटे व बनावट कागदपत्र तयार करत बँकेत अकाऊंट काढले. पुढे कंपनीने रद्द केलेला चेक त्या अकाऊंट वर भरला व कंपनीच्या खात्यातून तब्बल 44लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.
15 लाखांचे अंमली पदार्थ पकडले
दुसरीकडं शहरातील पुणे स्टेशन परिसरात पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ लाख रुपयांचे अंमली पदार्थ पकडले आहेत . पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळाच्या येथे सापाळा रचून ही करवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी 15 लाख 17 हजाराचे मेफेड्रोन , मोबाईल संच, रोख रक्कम असा एकूण17 लाखांचा मुद्दे माल पकडला या प्रकरणी सलीम मुबारक शेख व विजय विनोद डेडवालकर यांना अटक केली आहे.
Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे