पणजी : डेटिंग अॅपवर आधी मैत्री आणि नंतर प्रेम मग सेक्सच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुजरातमधून गोव्यात येणाऱ्या व्यावसायिकांना ही टोळी लक्ष्य करत होती. मोठ्या व्यावसायिकांना या मुली डेटिंग अॅप्सवर मित्र बनवायची आणि नंतर त्यांना डेटवर बोलवायची. या तरुणी व्यावसायिकाच्या खर्चाने हॉटेलमध्ये राहायच्या, शरीरसंबंधही ठेवायच्या. पण त्यानंतर मग ब्लॅकमेलिंगची कहाणी सुरू व्हायची. गुजरातमधील अनेक व्यावसायिक गोव्यात अडकून पडल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली असता हे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणी गोवा पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.
हे आंतरराज्यीय रॅकेट अनेक दिवसांपासून सुरु होते. स्वत:ला ब्युटीशियन असल्याचे सांगून या महिला डेटिंग अॅपवर व्यावसायिकांशी मैत्री करत असत. त्यानंतर ते व्यावसायिकांना हॉटेलमध्ये भेटायला बोलवत असत. संबंध प्रस्थापित केल्यानंतर ते पुरुषांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळायचे. पोलिसांनी तपास करत अशा किमान 15 महिलांना यामध्ये ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान या टोळीवर बलात्काराच्या खोट्या आरोपांच्या आधारे गोव्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकांवर या महिला खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करत असतं. गुजरातमधील काही महिलांनी अनेकवेळा अशाच तक्रारी केल्याने पोलिसांना संशय आला. सर्व प्रकरणांमध्ये, तिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता, परंतु तपास खोटा निघाला. अशाच एका प्रकरणात 22 ऑगस्ट रोजी एक ब्युटीशियन, तिचा चुलत भाऊ आणि ड्रायव्हर उत्तर गोव्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये गुजरातमधील एका व्यावसायिकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेने व्यावसायिकासोबत पोलिस ठाण्याच्या बाहेर दोन लाख रुपयांवर समझोता केला. दोन दिवसांनंतर त्याच लोकांनी तक्रार करण्यासाठी दुसरे पोलीस ठाणे गाठले. यावेळी महिलेच्या चुलत भावाने पीडित असल्याचा दावा केला. ब्युटीशिअनने स्वतःची ओळख त्याचा मित्र म्हणून करून दिली. तिने आरोप केला होता की ती गुजरातच्या एका कॉन्ट्रॅक्टरला गोव्याला येणा-या फ्लाइटमध्ये भेटली आणि त्याने तिला एका रिसॉर्टमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी कंत्राटदाराला अटकही केली, मात्र काही दिवसांतच असाच प्रकार पुन्हा समोर आला आणि आरोपी गुजरातमधील आणखी एक व्यावसायिक असल्याचे निष्पन्न झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या सर्व तक्रारी सारख्याच होत्या आणि महिलांचे प्रोफाइल देखील सारखेच होते. सर्व आरोपी गुजरातचे होते आणि त्यामुळे पीडितही होते. यावर पोलिसांना संशय आला आणि तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. फसवणूक झालेल्या महिलेने ज्या व्यावसायिकासोबत 2 लाख रुपयात तडजोड केली. त्याच्याकडून 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने नकार दिल्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली आणि नंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर व्यावसायिकाने 2 लाख रुपयांची तडजोड केली.