गडचिरोली | 14 ऑक्टोबर 2023 : गडचिरोली पोलिसांनी एक खतरनाक जहाल नक्षलवाद्याला अटक केलीय. या नक्षलवाद्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. चैनुराम वत्ते कोरसा असं नक्षलवाद्याचं नाव आहे. तो 48 वर्षांचा आहे. हा नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील टेकामेटा गावचा रहिवासी आहे. चैनुराम सध्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत आहे. चैनूराम 2000 मध्ये पर्लकोटा दलममध्ये सामील झाला होता. त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. चैनुराम याच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
छत्तीसगड राज्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी आणि पेंढरी पोलीस ठाण्याची रेकी करण्यासाठी चैनूराम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. चैनुराम नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सीमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी आणि पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सी सिकस्टी नक्षल विरोधी पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
चैनुराम वत्ते कोरसा याच्यावर अबुजमाड परिसरातील सर्वच नक्षल दलमला स्फोटके आणि इतर साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी होती. तो सध्या नक्षलवाद्यांचा साहित्य पुरवठा उपकमांडर या पदावर होता. चैनुराम सध्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत आहे. चैनुराम 2000 साली पर्लकोटा दलममध्ये सामील झाला होता. त्याच्यावर 2016 पासून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
चैनुराम याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. तर सरकारने त्याच्यावर 16 लाखांचे बक्षीस ठेवले होते. छत्तीसगड राज्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी आणि पेंढरी पोलीस ठाण्याची रेकी करण्यासाठी चैनूराम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष अभियान पथकाने त्याला ताब्यात घेतले. 2023 साली हिकेर येथे झालेल्या चकमकीचा तो प्रमुख सूत्रधार होता.