माशांना खाऊ टाकणाऱ्या विद्यार्थिनीचा शेततळ्यात बुडून मृत्यू; नाशिकमधल्या घटनेने हळहळ

| Updated on: Oct 16, 2021 | 3:01 PM

माशांना खाऊ टाकणारी विद्यार्थिनी पाय घसरून शेततळ्यात पडून मृत्यू पावल्याची घटना लासगाव तालुक्यातल्या आंबेवाडी येथे घडली आहे. उर्मिला बोराडे असे मृत मुलीचे नाव आहे.

माशांना खाऊ टाकणाऱ्या विद्यार्थिनीचा शेततळ्यात बुडून मृत्यू; नाशिकमधल्या घटनेने हळहळ
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः माशांना खाऊ टाकणारी विद्यार्थिनी पाय घसरून शेततळ्यात पडून मृत्यू पावल्याची घटना लासगाव तालुक्यातल्या आंबेवाडी येथे घडली आहे. उर्मिला बोराडे असे मृत मुलीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येवला तालुक्यातील विसापूर हद्दीतील आंबेवाडी येथे उर्मिला दत्तात्रय बोराडे ही विद्यार्थिनी आपल्या घरातील शेततळ्यात माशांना खाऊ टाकत होती. ती नेहमीच माशांना खावू टाकायची. मात्र, स्वतःच्या तंद्रीत असताना तिचा पाय अचानक घसरला. त्यामुळे ती शेततळ्यात पडली. यावेळी घरात किंवा तिच्याजवळ कोणीही नव्हते. त्यामुळे ती शेततळ्यात पडल्याचेही कुणाला समजले नाही. अखेर खूप शोधाशोध केली. तेव्हा तिचा मृतदेह शेततळ्यात सापडला. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात यापूर्वी दोन भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यातल्या एरंडगाव येथील संतोष पुंडलिक जगताप यांना हर्षल (वय १४) आणि सार्थक उर्फ शिवा (वय १२) ही मुले होती. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हर्षल आणि सार्थक उर्फ शिवा ही दोन्ही मुले शेतात गेली. जगताप यांच्या शेतात एक शेततळे आहे. या मुलांनी शेतात येताच आपला मोर्चा शेततळ्याकडे वळवला. सार्थक उर्फ शिवा हा कपडे काढून पोहण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खावू लागला. हर्षलने हे पाहताच भावाकडे झेप घेतली. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

औरंगाबादमध्येही तिघे होते बुडाले

औरंगाबाद येथील हर्सूल तलावामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ शंकर पदमाने असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. वैद्यकीय औषधी विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र मृत युवकाच्या खिशात आढळले आहे. यापूर्वी औरंगाबाद येथे सातारा डोंगरात ट्रेकिंक करायला एकूण सात मित्र गेले होते. हे सातही जण डोंगर परिसरातील तलावात गेले होते. मात्र, यावेळी तलावात बुडून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेत इतर सहा जण सुदैवाने बचावले होते. लखन ईश्वर पवार वय-19 (रा.शिव शंकर कॉलोनी,औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर याच दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. आदिल शेख असे या मुलाचे नाव असून केंब्रिज जवळच्या डोहात ही घडना घडली होती. आदिल शेख हा सहा फूट खोल पाण्यात बुडाल्यानंतर मित्रांनी आरडाओरड केली होती. मात्र, मदतीस उशीर झाल्याने या मुलाने प्राण सोडला होता.

इतर बातम्याः

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक