रांची : फेसबुकवर अनेक लोकांशी आपली मैत्री होते. तसेच अनेक तरुणांची लव्हस्टोरी ही फेसबुकवरतीच सुरु होते. मात्र, फेसबुकच्या माध्यमातून अनेकांना लुबाडण्याच्या घटना देखील बऱ्याचदा समोर आल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार झारखंडच्या गोड्डा येथे समोर आला आहे. मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या मुलीची झारखंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका मुलासोबत फेसबुकवर मैत्री झाली. पुढे या दोघांमध्ये फेसबुकचॅटच्या माध्यामातून प्रेम प्रकरण सुरु होतं. प्रियकराच्या मोहापाई मुलगी इतकी वाहत जाते की ती मुंबई सोडून झारखंडला जाते. पण तिथे गेल्यावर तिचा प्रियकर तिला बेदम मारहाण करतो. तिच्या जवळील सर्व रोख रक्कम आणि दागिने हिसकावून पळून जातो (Girlfriend went Jharkhand from Mumbai for her Boyfriend but he stolen her cash and jewelry).
नेमकं प्रकरण काय?
संबंधित पीडित मुलगी ही मुळची झारखंडच्या सिमडेगा येथील रहिवासी आहे. ही तरुणी मुंबईत नोकरी करते. या मुलीची तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर आरोपी मुलासोबत मैत्री झाली होती. तेव्हापासून त्यांच्यात बोलणंचालणं सुरु झालं. काही दिवसांमध्ये त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुलगी मुंबईत नोकरी करत असल्याने आरोपी मुलगाही मुंबईत दाखल झाला. त्यावेळी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.
मुलीने स्वत:च्या पैशांवर आरोपीला बाईक घेतली
दरम्यान, पीडित मुलीने आपल्या कष्टाच्या पैशांवर मुलासाठी बाईक घेऊन दिली. मुलीच्या बाजूने नातं खूपचं घट्ट झालेलं होतं. आरोपी मुलाचं नाव अभिषेक कुमार असं आहे. अभिषेक आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मुलगी 16 एप्रिलला मुंबईहून पाटण्याला गेली. तिथून अभिषेक तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचं कारण सांगत तो तिला झारखंडच्या गोड्डा येथे घेऊन आला. मात्र, गोड्डा येथे आणल्यानंतर तो घरी घेऊन जाण्याबाबत काहीही कारणं सांगू लागला. तो गोड्डा जिल्ह्यातील धोडा गावाचा रहिवासी आहे.
आरोपीकडून मुलीला मारहाण
आरोपी अभिषेकने मुलीला घरी घेऊन जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये खटके उडाले. यावेळी आरोपी अभिषेकने भर बाजारात तरुणीला बेदम मारहाण केली. यावेळी बाजारातील काही लोकांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पती-पत्नीमधील वाद असल्याचं सांगून लोकांना दूर होण्यास सांगितलं. यावेळी काही लोक बाजूला झाले. मात्र, गंमत बघणाऱ्या काहींना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली.
पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पोलीस येत आहेत याबाबतची माहिती मिळताच आरोपी अभिषेक घटनास्थळावरुन पळाला. मात्र, त्याआधी तो तरुणीच्या पर्समधील दीड लाख रोख रक्कम आणि दागिने घेऊन गेला. गोड्डा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते तरुणीला आपल्यासोबत पोलीस ठाण्याला घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी अभिषेकला बेड्या ठोकल्या. त्याने मुलीकडून हिरावलेले सर्व पैसे आणि दागिने पोलिसांनी जप्त केले. मुलीच्या तक्रारीच्या आधारावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत (Girlfriend went Jharkhand from Mumbai for her Boyfriend but he stolen her cash and jewelry).
हेही वाचा : क्रूरतेचा कळस! 35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप, आठ जण कोरोनाग्रस्त, पीडितेलाही संसर्ग