मुंबई : पनवेल परिसरातील तोंडरे गावात एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करून 27 तोळे सोने लुटल्याची घटना घडली होती. अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वृद्ध व्यक्तीच्या नातवानेच पैशांसाठी हा कट आखल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या मुलाने आपल्या अन्य दोन साथिदारांसोबत आजोबा ऑफीसमध्ये एकटेच असल्याची टीप दरोडेखोरांना दिली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करून 27 तोळ्यांच्या दागीन्यासह पोबारा केला होता. देविदास पाटील असे या वृद्धाचे नाव आहे.
घटनेबाबात अधिक माहिती अशी की, देविदास पाटील यांच्या अल्पवयीन नातवाला पैशांची गरज होती. ही गरज भागवण्यासाठी त्याने आपल्या आजोबांना लुटण्याचा कट रचला. देविदास पाटील यांना सोन्याच्या दागीन्यांची आवड असल्याने ते आपल्या अंगावर कायम सोन्याचे दागीने घालायचे. हेच दागीने लुटण्याचे नातवाने ठरवले. त्यासाठी त्याने प्लॅनची आखनी केली. त्याने आपल्या अन्य दोन अल्पवयीन साथीदारांची या कामात मदत घेतली.
ठरलेल्या प्लॅननुसार त्याचे आजोबा त्यांच्या ऑफीसमध्ये एकटेच असताना नातवाने आपल्या साथिदारांच्या मदतीने आरोपी शारूख कुरेशी आणि जुबेर खान यांना फोन केला. आजोबा ऑफीसमध्ये एकटेच असल्याची माहिती दिली. तोपर्यंत या मुलाचे इतर दोन साथिदार देविदास पाटील यांच्यावर लक्ष ठेवून होते. मुख्य आरोपी खारूख आणि जुबेर हे ऑफीसमध्ये शिरल्यानंतर त्याच्या मित्रांनीच ऑफीसचे शटर खाली ओढून घेतले. चोरट्यांनी देविदास यांच्यावर हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्यांच्याकडे असलेले सोने घेऊन पोबारा केला. या घटनेत देविदास हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान या दरोड्यामगील मुख्य सूत्रधार हा अल्पवयीन नातूच असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन चोरांसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
अल्पवयीन मुलीचा सौदा; दोन महिलांना अटक; पोलिसांनी ‘अशी’ केली मुलीची सुटका
रायगडमध्ये महिला सरपंचाची हत्या, ‘ऑस्कर’नं वास घेत आरोपीला पकडलं, वाचा संपूर्ण घटनाक्रम