बायको प्रेग्नेंट होत नव्हती, पत्नीची टेस्ट केल्यानंतर नवऱ्याला बसला मोठा धक्का, FIR, काय आहे प्रकरण?

| Updated on: Jul 29, 2024 | 8:58 AM

नवऱ्याने बायको विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. डॉक्टरने त्यावेळी त्याला अशी गोष्ट सांगितली, त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. युवतीच वय 32 तर मुलगा 34 वर्षांचा होता. दोन्ही कुटुंबीय या लग्नासाठी राजी झाले. 19 जून 2023 रोजी दोघांच लग्न झालं.

बायको प्रेग्नेंट होत नव्हती, पत्नीची टेस्ट केल्यानंतर नवऱ्याला बसला मोठा धक्का, FIR, काय आहे प्रकरण?
sonography Test
Follow us on

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक वेगळच प्रकरण समोर आलय. नवऱ्याने बायकोविरोधात फसवणुकीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. बायकोने सत्य लपवलं, तिने फसवलं असा नवऱ्याचा आरोप आहे. त्याने आता घटस्फोटाची मागणी केली आहे. पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा पोलिसांकडे केली आहे. अहमदाबादच्या सरखेज भागातील हे प्रकरण आहे. तक्रारदार व्यक्तीच्या लग्नाची बोलणी मे 2023 मध्ये सुरु झाली. पालनपुर गावातील एका युवतीसोबत लग्न ठरवण्यात आलं. दोन्ही कुटुंब भेटली. युवतीच वय 32 तर मुलगा 34 वर्षांचा होता. दोन्ही कुटुंबीय या लग्नासाठी राजी झाले. 19 जून 2023 रोजी दोघांच लग्न झालं. कुटुंब विस्ताराचा निर्णय दोघांनी घेतला. दोघांनी बाळासाठी प्लानिंग केलं. पण महिला प्रग्नेंट होत नव्हती.

म्हणून दोघे एका डॉक्टरकडे गेले. महिला डॉक्टरने काही औषध दिली. पण त्याने सुद्धा काही फरक पडला नाही गर्भधारणेचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नवऱ्याला संशय आला, म्हणून त्याने बायकोची पुन्हा सोनोग्राफ टेस्ट केली. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तो वहिनीसोबत पालडी येथील स्त्री रोग तज्ज्ञाकडे गेला. डॉक्टरने त्यावेळी त्याला अशी गोष्ट सांगितली, त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

नंतर तिने मान्य केलं

महिलेच्या गर्भाशयात काही समस्या आहे, म्हणून तिची गर्भधारणा होत नसल्याचे डॉक्टरने सांगितलं. महिलेच वय लक्षात घेता, नैसर्गिक गर्भधारणा थोडी कठीण असल्याच डॉक्टरच मत होतं. नवऱ्याने जुहापुरा येथील अन्य डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला. त्या डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितलं. नवऱ्याने घरी जाऊन या बद्दल बायकोला विचारलं. आधी ती उत्तर द्यायला टाळाटाळ करत होती. नंतर तिने मान्य केलं. फसवणूक करुन लग्न केल्याच तिने कबूल केलं. पत्नीने यासाठी माफी मागितली. पण नवऱ्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरोधात पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार नोंदवली.

पत्नीची खरी डेट ऑफ बर्थ काय?

नवऱ्याकडे पत्नीचे सर्व सर्टिफिकेट आहेत. त्यात डेट ऑफ बर्थ मेंशन आहे. पत्नीची डेट ऑफ बर्थ 18 मे 1985 आहे. त्यात बदल करुन 18 मे 1991 करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. पतीने पत्नीवर बरेच आरोप केले आहेत. नवरा घटस्फोटावर अडून बसला आहे. त्याल हे लग्न संपवायच आहे.